आपल खान्देशमहाराष्ट्र

आश्चर्यच! गायीच्या पोटातून निघालं सोनं? निफाड तालुक्यातील घटना

निफाड (जि.नाशिक) : सूर्यकेतू नाडी सूर्याच्या संपर्कात आल्याने गोमाता सोन्याची निर्मिती करते, असे म्हटले जाते. मात्र जेव्हा गायीच्या पोटातून अनपेक्षितरीत्या सोन्याची अंगठी निघते, तेव्हा तिला ‘कामधेनू’ हाच शब्दप्रयोग लागू होतो.

गायीच्या पोटातून निघालं सोनं?

निफाड तालुक्यातील कोळगाव येथील प्रगतिशील शेतकरी विनायक वाघ यांची गाय चारा खात नाही, हे त्यांच्या लक्षात आले. यासंदर्भात त्यांनी मंजूर येथील डॉ. सोनवणे यांना गायीला तपासणीसाठी बोलावले असता वैद्यकीय भाषेत, ‘फॉरेन बॉडी’ची म्हणजे पोटात काहीतरी गिळल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. त्यासाठी तातडीने शस्त्रक्रिया करणे गरजेची असल्याचा सल्ला दिला.

त्यानुसार त्यांनी संदर्भीय उपचारासाठी कोळपेवाडी येथील डॉ. सुशील कोळपे यांना बोलावले. तीन महिन्यांपूर्वी वाघ यांच्या पत्नीची घास कापताना एक तोळ्याची सोन्याची अंगठी हरवली होती, ती शोधूनही सापडली नाही. शस्त्रक्रिया केल्यावर गायीच्या पोटातून ती अंगठी निघाली. ही अंगठी बघून त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांनी गायीची तातडीने जागेवरच शस्त्रक्रिया केली असता तिच्या पोटातून बारीक खिळे, बारीक पत्रे निघाले. त्यामुळे गायीच्या आजारपणाच्या चिंतेत असणाऱ्या वाघ कुटुंबीयाने गाय बरी होण्याबरोबरच हरवलेले सोनेदेखील सापडल्याने समाधान व्यक्त केले. तसेच गायीचा जीव वाचविल्याबद्दल डॉक्टरांचे आभार मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे