ब्रेकिंग

उल्हासनगरात इमारतीचा पाचव्या मजल्यावरील स्लॅब कोसळला; 5 जणांचा मृत्यू

उल्हासनगर कॅम्प २ मधील साई शक्ती इमारतीत ही दुर्घटना घडली. या इमारतीमध्ये पाच मजले (तळ+5) आहेत. घटनास्थळी उल्हासनगर अग्निशमन दलाचे जवान व पोलीस कर्मचारी, रुग्णवाहिकेसह उपस्थित आहेत. सदर घटनेत ५ व्यक्तींचे मृतदेह सापडले असून, अद्याप ३ ते ४ व्यक्ती इमारतीमध्ये अडकल्या असून उल्हासनगर अग्नशामक केंद्राकडून बचावकार्य सुरू आहे.

 घटनेची माहिती कळताच ठाणे महानगरपालिकेची TDRF टीम घटनास्थळी पोहोचत आहे. तोपर्य़त पोलिसांनी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी काही प्रमाणात ढिगारा हटविला असून त्यातून पाच जणांचे मृतदेह बाहेर काढले आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे