कृषीवार्ता

पाचोरेकर इतकं तरी करा!

पाचोरे कर इतकं तरी करा! – दिलीप परदेशी

पाचोरेकर सध्या रखरखता कडक उन्हाळा आहे,,काही दिवसात पावसाळा येईल आपल्याकडे पाऊस यायला किमान 20 दिवसांचा अवधी आहे . आपण आपल्या जवळील रोज कमी होत जाणारी जंगल आणि वृक्षसंपदा पाहत असतो त्यासाठी मनात आणलं तर बरच काही करता येईल . तर आजपासून आपण एक काम करूया सध्या बाजारात नाही म्हणायला आंबे ,चिकू ,जांभळं ,सीताफळ  ,मोसंबी ,लिंबू अशी फळं उपलब्ध आहेत यापैकी तुम्ही जी कुठली फळे खात असाल त्यांचं बिया फेकू नका या बिया स्वच्छ पाण्याने धुवून कडक उन्हात वाळवून घ्या .चांगल्या सुकल्या की त्यांचावर हलकीशी हळद मारा आणि जून मध्ये पावसाळ्याचा पहिला आठवडा म्हणजे किमान 4 वेळा पाऊस पडून गेला की या बिया तुम्ही पाचोरा शहरांत आसपास जी जंगलं आहेत, तिथे या बिया टाका या टाकताना ही ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी एक टोकदार काठी किंवा सळई ने किमान 2 ते 3 इंचाचा खड्डा करून या बिया टाकाव्यात . याच्या व्यतिरिक्त तुम्ही हिरडा ,बेहडा ,आवळा ,भारंगी ,पांगारा, शिकेकाई साग ,उंबर ,पिंपळ ,वड ,कण्हेर ,कडुलिंब ,पांढरी ,अंजन ,बाभूळ या झाडांच्या बिया आणि फांद्या ही नेऊन रुजवू शकता . अनेकांकडे कुंडीत कोरफडी च जंगल माजत त्या कोरफड पावसाळ्यात अशाच नेऊन जंगलात टाकल्या तरी चांगल्या रुजतात ,या प्रकारे तुम्ही झेंडू सोडून अनेक फुलांच्या बिया आणि सुकलेल्या फुलांचा चुरा असाच माळरानावर टाकला तरी चालेल ,आपल्यात अनेक जण असे असतील की त्यांना ईच्छा आहे पण फुल आणि फळांचा बिया गोळा करायला वेळ नाही तर ते लोक अमेझॉन आणि नर्सरीत जाऊन बिया आणू शकतात यात सुगंधी फुलझाडांच्या बिया आणून टकल्या तर अजून उत्तम .तुम्ही प्रत्येकाने किमान 10 बिया जरी योग्य पद्धतीने मातीत टाकल्या तरी एक खूप मोठं कार्य होईल ,याने वृक्षांची वाढ तर होईल पण सोबत प्राणी आणि पक्षी ही वाढतील ,आपल्या शहरांत रोज किमान 200 लोक तरी सध्या येतात हे प्रमाण लॉक डाऊन नंतर 500 वर जाईल यातील किमान 100 लोकांनी बिया टकल्या तरी त्या भरपूर होणार आहेत हाच प्रकार मुळला ही करू या.

ही विनंती आपलाच एक पाचोरेकर

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे