आपल खान्देश
कर्जतमधील तरुणाचा अमेरिकेत अनोख्या पद्धतीने विवाह संपन्न, दोघांच्या कुटुंबाची ऑनलाईन उपस्थिती
कर्जत तालुक्यातील तरुणाचा अमेरिकेत अनोख्या पद्धतीने विवाह संपन्न, दोघांच्या कुटुंबाची ऑनलाईन उपस्थिती
कोरोना आणि अमेरिकेतील लग्न
श्री प्रभाकर गंगावणे रायगड जिल्हा प्रतिनिधी
कर्जत: कर्जत तालुक्यातील वंजारवाडी येथील रहिवाशी व मुंबई येथे पोलिस निरीक्षक पदावर रुजु असलेले अनिल शंकर थोरवे ह्यांचा मुलगा अजय अनिल थोरवे आणि त्याची भारतातील केरळ येथील ब्राम्हण कुटुंबातील वर्ग मैत्रीण श्रीनिधी श्रीनिवास राघवन यांचे भारतीय वेळेनुसार दिनांक १७ मे २०२१ रोजी सकाळी सहा वाजुन पंधरा मिनिटांनी सिॲटल अमेरिका येथे विवाह सोहळा पार पडला. सदर लग्नामध्ये दोघांचे सुमारे वीस मित्र-मैत्रिणी हजर होत्या.
कोरोना महामारीमुळे व विमान सेवा बंद असल्यामुळे दोघांच्या कुटुंबातील कोणीही सदस्य लग्नाला हजर राहू शकले नाही. अजय आणि श्रीनिधी यांचं लग्न सुमारे दीड वर्षांपासून प्रलंबित होतं. कोरोनाची पहिली लाट आल्यानंतर २ एप्रिल २०२१ रोजी मुंबईमध्ये लग्न करण्याचे ठरले होते. त्यासाठी हॉटेल देखील बुक केले होते. सदर वेळी कोरोनामुळे अमेरिकेहून विमानांची वाहतूक बंद झाल्याने त्यांचे लग्न १७ मे रोजी मुंबईत करण्याचे ठरले होते. परंतु, ह्या ही वेळी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने विवाह सोहळ्याच्या दुस-या नियोजनावर देखील पाणी फिरले आणि दोघांना भारतात यायला जमले नाही. म्हणुन दोघांच्या कुटुंबियांनी त्यांचे लग्न अमेरिकेत करण्याचा निर्णय घेतला व भारतातून ऑनलाइन हजेरी लावण्याचे निश्चित केले.




