आपल खान्देश

बंगळूर घटनेचा नाशिक जिल्हा मुस्लिम उत्कर्ष समितीतर्फे समाजकंटकांचा जाहीर निषेध

बंगळूर घटनेचा नाशिक जिल्हा मुस्लिम उत्कर्ष समितीतर्फे समाजकंटकांचा जाहीर निषेध

नांदगाव(प्रतिनिध) मुक्ताराम बागुल- कर्नाटकातील बंगलोर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची काही समाजकंटकांनी विटंबना केली होती. त्याच्या निषेधार्थ मुस्लिम उत्कर्ष समितीचे जिल्हा अध्यक्ष सादिक पठाण यांनी जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना निषेधाचे निवेदन देण्यात आव्हान केले होते. क्या हुआ नाला प्रतिसाद देत मनमाड शहर शाखेतर्फे मंडळ अधिकारी व मनमाड शहर पोलीस ठाणे येथे निवेदन देण्यात आले. सदर निवेदनात म्हटले आहे की श्री छत्रपती शिवाजी महाराज हे बहुजन प्रतिपालक होते व ते सर्व समाजासाठी आदर्श व्यक्ती चे प्रतीक आहे. परंतु काही राजकीय पक्ष आपले राजकीय हित सांभाळण्यासाठी समाजकंटकांना हाताशी धरून सामाजिक बांधिलकी व सामाजिक सलोख्याचे वातावरण खराब करण्याचे प्रयत्न करीत आहेत. अशा घटनेचा नाशिक जिल्हा मुस्लिम उत्कर्ष समितीने तीव्र शब्दात नोंदवित आहे. शासनाने अशा घटनांची दखल घेऊन समाजकंटकांवर कडक कारवाई करावी अशी मागणी निवेदनात केली आहे. यावेळी मुस्लिम उत्कर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष व माजी नगरसेवक सादिक पठाण, आझाद पठाण, नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख अल्ताफ शहा, जिल्हा संघटक मोहसीन शेख, मनमाड शहर अध्यक्ष बाबा पठाण, अख्तर शेख, वसीम सय्यद, शहीद शेख, इस्माईल पठाण, मुकेश शेख, इम्रान पठाण( डायमंड) इत्यादी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे