मराठवाडामहाराष्ट्रसखी

अहमदनगर नव्हे, आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर..

अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा घेण्यात आलाय. नगर शहराचे नाव आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्यात आले आहे. काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहराचे नाव बदलण्याची घोषणा केली होती. अहमदनगर शहराचे तसेच जिल्ह्याचे नामकरण अहिल्यानगर करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

अहमदनगर शहराचे नाव बदलण्याची मागणी गेले अनेक दिवस राज्यातील धनगर समाज अग्रही होता जिल्ह्यात उपोषणही करण्यात आले व जिल्ह्यात विविध लोकप्रतिनिधी तसेच धनगर समाज संघटनांनी केली होती. अहमदनगर महानगरपालिकेने नाव बदलण्यासंदर्भात ठराव पारित करून राज्य शासनाला पाठवला होता. या संदर्भात विभागीय आयुक्त, नाशिक यांच्याकडून राज्य सरकारने माहिती मागविली होती. या अनुषंगाने केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सुधारित मार्गदर्शक तत्वानुसार हे नामकरण करण्याची शिफारस राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. हा प्रस्ताव मान्यतेसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. केंद्र सरकारकडून मान्यता मिळाल्यानंतर अहमदनगर जिल्हा, तालुका तसेच महानगरपालिकेचे ‘अहिल्यानगर’ असे नामांतरण करण्यात येणार आहे. नामांतरणाची प्रक्रिया राज्याच्या महसूल व नगर विकास विभागाकडून करण्यात येणार आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे