गिरड ग्रामपंचायतने अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास निधी कुठे खर्च केला..?
- कैलास सोनवणे
भडगाव तालुक्यातील गिरड ग्रामपंचायतने अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास निधी इतर ठिकाणी वळविल्याने गिरड गावातील अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्तीच्या नागरिकांनी या कारभारा बाबत विचारणा केली असता काहीच उत्तर देता आले नसल्याने संबंधित दलित नागरिकांनी उपोषणाचा इशारा देत सदर ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार उघकीस आणल्याने अनेकांच्या भुवया उंचावाल्या आहेत.
विविध योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत निधीतून अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास करणे योजनेतर्ंगत पाणी पुरवठयांची कामे, मलनिःसारण, वीज, गटार बांधणे, अंतर्गत रस्ते, पोहच रस्ते, समाज मंदिराचे बांधकाम इत्यादी विकास कामांसाठी निधीतुन ग्रामपंचायत द्वारे कामे होतात मात्र भडगाव तालुक्यातील गिरड ग्रामपंचायतिने हा निधीद्वारे रस्ते काँकरिटिकरण अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीत न करता इतर ठिकाणी वळविल्याने सदर घटक हे या सोई सुविधापासून वंचित झाल्याने त्यांनी गिरड ग्रामपंचायतीला जो निधी मंजूर केला केला आहे तो निधी अनुसूचित जाती व नवोबौधद वस्तीतच खर्च झाला पाहिजे अन्यथा अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्तीतील माणसे उपोषणास बसतील असा इशारा देण्यात आला असून त्यावर जळगाव जिल्हाप्रशासन गिरड ग्रामपंचायतवर काय एक्शन घेते याचे लक्ष लागून आहे.
राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील अनुसुचित जाती व नवबौध्द वस्त्यांतील अनुसुचित जाती व नवबौध्द घटाकांच्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी सदर जिल्हास्तरीय विविध योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येते व निधीतून अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांचा वस्तीचा विकास करणे (पुर्वीचे नांव दलित वस्ती सुधार योजना) योजना जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत अंमलात आणली जाते.



