ठाण्यात सुभेदार मल्हारराव होळकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..
ठाणे (झूम मराठी) धनगर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य,ठाणे जिल्हा व धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ,ठाणे यांच्या वतीने श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त ठाण्यातील जांभळी नाका,मासुंदा तलाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मल्हारराव होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना धनगर समाज संघर्ष समिती महाराष्ट्र प्रदेश सचिव ज्ञानेश्वर परदेशी, धनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे,धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाचे अध्यक्षा माधवी बारगीर, कार्याध्यक्ष महेश गुंड, सचिव तुषार धायगुडे, सल्लागार मनोहर वीरकर, सुर्यकांत रायकर, कार्यकारणी सदस्य सुरेश भांड,संतोष बूधे, महेश पळसे, शशिकांत वाघमोडे, महिला मंडळाच्या उपखजिनदार सुषमा बुधे सदस्य सुजाता भांड, वंदना वारे, अमृता बुधे आदीसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.




