ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकीय

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक!

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी रात्री सक्तवसुली संचलनालयाकडून अटक करण्यात आल्यामुळे देशाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. केजरीवाल यांना उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित ‘मनी लॉन्डिंग’ प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केलेली आहे.

राजधानी दिल्लीतील वादग्रस्त मद्यधोरणाशी संबंधित प्रकरणात, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) चौकशीसाठी बोलावलेले असतानाही केजरीवाल अनेकदा गैरहजर राहिले. याप्रकरणात अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून नऊ वेळा समन्स बजाविण्यात आले होते. परंतु केजरीवाल यांनी एकाही समन्सला उत्तर दिलेले नव्हते. अखेर २१ मार्च रोजी चौकशीसाठी हजर राहण्याकरिता केजरीवाल यांना नववे समन्स बजाविण्यात आले आहे. परंतु आजही त्यांनी उत्तर न दिल्याने अखेर गुरूवारी रात्री त्यांच्यावर ईडीने अटकेची कारवाई केली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे