भाजपच्या भटके विमुक्त आघाडीच्या लोकसभा कल्याण संयोजक पदी महेंद्र परदेशी यांची नियुक्ती
- दिलीप जय परदेशी
कल्याण (झूम मराठी) भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणूक साठी सरसावली असून राज्यात भाजप भटके विमुक्त आघाडीच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी तब्बल 48 लोकसभा संयोजक जाहीर करण्यात आले असून त्यात कल्याण लोकसभा संयोजक पदी महेंद्र परदेशी यांची नियुक्ती करण्यात आल्याने समाज माध्यमातून त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होताना दिसत आहे.
देशभर राज्या राज्यात लोक सभा निवडणूकीचे वारे वाहत आहेत प्रत्येक पक्ष लोकसभा निवडणूक जिकण्यासाठी कबर कसतांना दिसत आहे भाजपनेही सर्व आघाडीच्या नव नियुक्ती करून जोरात तयारीला लागली आहे. राज्यात भाजप भटके विमुक्त आघाडीच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राहुल केंद्रे यांनीही आपली लोकसभा संयोजकांची टीम नियुक्ती करून सर्व साधारण नागरिकां पर्यंत मोदी सरकारचे कार्य व कामाचा अहवाल सादर करून नागरिकां पर्यंत आम्ही पोहचणार आहेत असे महेंद्र परदेशी यांनी झूम मराठीशी बोलतांना सांगितले
नवनियुक्त लोकसभा संयोजक हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी व अब की बार ४०० पार यासाठी जिल्हाभर प्रवास करावा व भारतीय जनता पक्षाचे खासदार निवडुन आणण्यासाठी प्रयत्न करावेत या शुभेच्छा भाजप भटके विमुक्त आघाडीच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी दिल्या.




