तर मी उपोषण मागे घेतो, निर्णय मान्य,पण…,” जरांगे पाटलांनी सरकारकडे घातली ‘ही’ अट..
मराठा आरक्षणासंदर्भात काल मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत जरांगे पाटलांच्या उपोषणावर तोडगा काढण्यासाठी चर्चा करण्यात आली. यामध्ये तीन पिढ्यांच्या आधीचे कुणबी रेकॉर्ड्स असलेल्यांना सरकार कुणबी म्हणून मान्यता देणार असून कुणबी रेकॉर्डसे नियम ठरवण्यासाठी माजी न्या. संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एका महिन्यात समिती स्थापन करून कुणबी दाखल्यांबाबत निर्णय घेणार, त्यावर आता मनोज जरांगे पाटलांनी सरकारकडे एक अट घातली आहे.
मुख्यमंत्री एकनात शिंदे यांनी काल मराठा समाजसंदर्भात निर्णय घेतले. माझ्याकडे काल अर्जून खोतकर, राजेश टोपे आणि नंतर रावसाहेब दानवे आले होते. ज्या मराठा समाजाकडे कुणबीची नोंद आहे. त्यांना आजपासून त्यांना कुणबी प्रमाणपत्र भेटणार आहे. पण आमचं म्हणणं आहे, एकच सुधारणा करा. आमच्याकडे वंशावळीचे प्रमाण पत्र नाहीत. त्यामुळे वंशावळी शब्द काढा अन् सरसकट प्रमाण पत्र मिळेल, असं म्हणा, मी उपोषण मागे घेतो असं जरांगे पाटील म्हणाले.
दरम्यान, जालना येथे मराठा समाज बांधवांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ आज सांगलीत उत्स्फूर्तपणे बंद ठेवण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यातील मराठा समाजाच्या वतीने आज सांगली बंदची हाक देण्यात आली होती. त्यानुसार आज सांगली ग्रामीण जिल्हा आणि सांगली शहर कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे. तर करमाळा शहर बंद ठेवत भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही प्रमूख मागणी यावेळी करण्यात आली आहे.



