आपल खान्देशगुन्हेगारीसखी

पाचोऱ्यात नात्याला काळिमा फसणारी घटना..

जळगाव जिल्ह्यात अनेक दिवसापासून अल्पवयीन मुलीसह महिलावर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेत नियमित वाढ होत असतांना दिसत आहे. नुकतेच पाचोरा शहरातील एका भागातील नऊ वर्षीय बालिकेवर नात्यातीलच १८ वर्षीय युवकाने अत्याचार केल्याची घटना संतापनजक घटना रविवार, 3 रोजी दुपारी घडली. या प्रकरणी पाचोरा पोलिसात अल्पवयीन पीडीतेच्या आईने दिलेल्या तक्रारीअंती गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी तरुणाला अटक करण्यात आली.

परीसरात राहणाऱ्या मिळालेल्या माहितीनुसार, नऊ वर्षीय बालिकेचे आई-वडील बाहेरगावी गेल्याने बालिकेस याच आपल्या नातलगांकडे ठेवण्यात आले होते. रविवारी दुपारी बालिका व तिचा नातलग असलेला युवक घरात एकटे असल्याने त्याचा फायदा घेऊन बालिकेवर अतिप्रसंग करण्यात आला. भयभीत झालेल्या बालिकेने आपबिती सांगितल्यानंतर सायंकाळी पोलिसात पीडीतेच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला व त्यास अटक रकण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे करीत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे