कृषीवार्तामहाराष्ट्र

Punjabrov Dukh | पैसे घेऊन हवामान अंदाज सांगतात? डख यांच्यावर गंभीर आरोप, महाराष्ट्रात सर्वत्र होतेय चर्चा, वाचा….

 

भरमसाठ पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करुन शेतकऱ्यांना पेरणीला प्रोत्साहन करणारे कथित हवामानतज्ञ पंजाबराव डख पुन्हा एकदा तोंडघशी पडले आहेत. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानंतर आता दुष्काळ पडणार आहे असं सांगत डखांनी नवा व्हिडीओ रिलीज केल्यानं शेतकरी मात्र संतापले आहेत.

काही वर्षे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये आपल्या हवामान अंदाज साठी पंजाबराव डख हे व्यक्तिमत्व विशेष लोकप्रिय आहे. डख यांचा हवामान अंदाज तंतोतंत खरा ठरत असल्याचं मत शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे राज्यातील कानाकोपऱ्यात डख यांच्या नावाचं वादळ गेल्या काही वर्षात पाहावयास मिळत आहे.

शेती व्यवसायात जमीन आणि पाणी हे दोन घटक जेवढे महत्त्वाचे आहेत तेवढाच महत्त्वाचा घटक आहे हवामानाचा. शेतीची कामे करण्यासाठी हवामानाचा पूर्व अंदाज शेतकऱ्यांसाठी खूपच फायदेशीर ठरतो. विशेषता मान्सून काळामध्ये हवामान अंदाजाचे महत्व वाढते. हवामान अंदाज सांगण्यासाठी देशात एक विशेष यंत्रणा कार्यान्वित आहे. 

इंडियन मेटेओरोलॉजिकल डिपार्टमेंट अर्थातच भारतीय हवामान विभाग देशातील शेतकऱ्यांसाठी तसेच सामान्य नागरिकांसाठी हवामानाचा पूर्व अंदाज व्यक्त करत असते. भारतीय हवामान विभागातील शास्त्रज्ञ सॅटॅलाइटच्या म्हणजे उपग्रहाच्या माध्यमातून तसेच विविध हवामान प्रणालीचा अभ्यास करून हवामान अंदाज व्यक्त करत असतात. यासाठी विविध हवामान मॉडेलचा अभ्यास हे शास्त्रज्ञ लोक करतात. 

मात्र या सर्वांमध्ये महाराष्ट्रात हवामान अंदाजासाठी एक व्यक्ती विशेष लोकप्रिय बनली आहे. ती व्यक्ती आहे पंजाब डख. या व्यक्तीच्या हवामान अंदाजावर राज्यातील शेतकरी डोळे बंद करून विश्वास ठेवतात. त्यांच्या हवामान अंदाजावर आपली शेतीची कामे शेतकरी करत असतात. आता मात्र पंजाब डख यांच्या हवामान अंदाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत.

याचे प्रमुख कारण म्हणजे यंदाच्या मान्सून संदर्भात पंजाब डख यांनी वर्तवलेला हवामान अंदाज हा पूर्णपणे खोटा ठरला असून मानसूनने त्यांच्या हवामान अंदाजाला चकवा दिला आहे. पंजाब डख यांनी जवळपास दीड ते दोन महिन्यांपूर्वी यंदा मान्सून काळात जोरदार पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त केला होता.

विशेष म्हणजे गेल्या महिन्यात त्यांनी जून महिन्यात याआधी कधीही पाऊस पडलेला नसेल एवढा मोठा पाऊस होईल असा अंदाज व्यक्त केला होता. तसेच त्यांनी आठ जूनला मान्सूनचे आगमन होईल आणि मान्सून 22 जूनच्या सुमारास संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल असा अंदाज व्यक्त केला होता. तसेच राज्यात 27 जून पर्यंत शेतकऱ्यांच्या पेरण्या पूर्ण होतील असे देखील सांगितलं होतं.

या पार्श्वभूमीवर अनेक शेतकऱ्यांनी धूळवाफ पेरण्या केल्यात. म्हणजेच अनेक शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व पेरण्या केल्या आहेत. मात्र अजूनही मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचलेला नाही. मानसून अजूनही सिंधुदुर्गमध्ये रेंगाळलेला पाहायला मिळत आहे. विशेष बाब अशी की भारतीय हवामान विभाग जवळपास दोन महिन्यांपासून यावर्षी मान्सून कमकुवत राहील असा अंदाज व्यक्त करत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे