आपल खान्देशगुन्हेगारीमहाराष्ट्र

Bhadgaon | भडगाव बजाज शोरूम मधील ३० मोटारसायकल चोरी, अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल

झूम मराठी ऑनलाईन न्यूज मीडिया

भडगाव (झूम मराठी- संभाजी पाटील) भडगाव शहरातील चाळीसगाव रोड वरील साई ऑटो सेंटर (बजाज शोरुम) येथून बजाज कंपनीच्या ३० मोटारसायकल अज्ञात चोरट्याने लांबविल्या. यामधे १६ प्लॅटिना १४ पल्सर गाड्या चोरीस गेल्याची घटना घडली असून ही घटना शोरुम मधील स्टॉक रजिस्टर चेक केल्यानंतर उघडकीस आली असून एकूण २३ लाख रुपये किंमतीच्या मोटासायकल चोरी झाल्या आहे. या बाबत भडगाव पोलिस स्टेशनला अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

चाळीसगाव रोड वरिल साई ऑटो सेंटरचे मालक रावसाहेब केशव पाटील(वय-५६) रा. भडगाव यांनी भडगाव पोलीसात फिर्याद दिली आहे.फिर्यादीत त्यांनी म्हटले आहे की, नेहमीप्रमाणे सकाळी १०:०० वाजता साई ऑटो शोरुम ला जावुन कामावर देखरेख तसेच दुचाकी वाहनांच्या विक्री बाबत तपशिलाची माहिती घेत असतो. दिनांक ११/०६/२०२३ रोजी दुपारी ३ वाजेनंतर मी तसेच माझे सोबत शोरुमचे मँनेजर महेश लोटन पाटील, रा. भडगाव आम्ही शोरुम मधील दुचाकी वाहनांच्या स्टॉक ची पडताळणी करणेबाबत ठरविले व पडताळणी केली.

त्यानंतर पडताळणी दरम्यान आम्हास काही दुचाकी वाहने कमी दिसुन आल्यात त्याबाबत आम्ही आमच्या कडील शिल्लक स्टॉक एन्ट्री व सेल झालेल्या दुचाकी वाहनांबाबत अधिकची पडताळणी केली असता, आम्हास सदर स्टॉकमध्ये ३० दुचाकी वाहने कमी आढळुन आल्या. त्यानंतर आम्ही खात्री केली असता शोरुम मधील बजाज कंपनीच्या ३० गाड्या चोरी झाले बाबत लक्षात आले.

त्यात बजाज कंपनीच्या १६ प्लॅटिना व १४ पल्सर अश्या ३० दुचाकी एकुण २२,७७,९८० रु. किंमतीचा एकुण मुद्देमाल विना पासिंगच्या बजाज कंपनीच्या मोटार सायकली, माझ्या मालकिच्या साई ऑटो शोरुम मधुन कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी वेळोवेळी काढुन चोरुन नेल्या आहेत.

या बाबत भडगाव पोलिस स्टेशनला फिर्यादी रावसाहेब केशव पाटील रा. भडगाव यांच्या फिर्यादवरून गु. र. न.१७१/२०२३ भा.द.वी कलम ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो. हे कॉ. नितीन रावते हे करीत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे