Sillod | सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव पेठ येथे, अंगणात खेळत असताना भरधाव पीकअप गाडीच्या धडकेत साडे तीन वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू..
सिल्लोड (झूम मराठी) सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव पेठच्या एका शेतकऱ्याच्या लहान मुली आरुषी आणि पूर्वी यां दोघी घरासमोरील अंगणात खेळत असताना भरधाव पीकअप गाडीच्या धडकेत साडे तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल घडली. पूर्वी स्वप्नील गुंजाळ असे या चिमुरडीचे नाव आहे. ही घटना संध्यकाळी सहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
भवन ते पिंपळगाव पेठ रोड वर राहणाऱ्या शेतकरी स्वप्नील भिकन गुंजाळ घराच्या बाहेर त्यांच्या दोन मुली आरुषी आणि पूर्वी अंगणात खेळत होत्या. आई-वडील घरात कामानिमित्त गुंतले होते. त्यातच बेफाम भरधाव सफेद रंगाच्या पीकअप गाडीने ( गाडी क्रमांक – MH20 AT 6357) खेळत असलेल्या साडे तीन वर्षीय पूर्वीला चिरडले त्यात पूर्वीला डोक्याला गंभीर दुखापत झाली, ही घटना शेजारी राहणाऱ्या साईनाथ गुंजाळ यांच्या लक्षात आल्याने आरडाओरड केली. तेव्हा धावत आई वडील घराबाहेर आले आल्यानंतर पूर्वी हिला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहॆ. मृत पूर्वीच्या नातेवाईकांनी रुग्णालयात एकच आक्रोश केला होता. घटनेची माहिती मिळताच सिल्लोड पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते व संबंधित पीकअप गाडीला पोलीस ठाण्यात नेण्यात आली. व चालक नासेरखा मुलतानी याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस अधिकारी विकास चतरू हे करत आहेत.



