शेतकऱ्यांच्या उत्कर्षासाठी, नाही हक्कासाठी लढणाऱ्या नांदेडमध्ये होत असलेल्या सभेसाठी उपस्थित रहा – नानासाहेब बच्छाव
शेतकऱ्यांच्या उत्कर्षासाठी, नाही हक्कासाठी लढणाऱ्या नांदेडमध्ये होत असलेल्या सभेसाठी उपस्थित रहा – नानासाहेब बच्छाव
पत्रकार मुक्ताराम बागुल
भारत राष्ट्र समितीच्या नांदेडमध्ये होत असलेल्या दिनांक 5 फेब्रुवारी 2023 रोजी महाराष्ट्र राज्यातील पहिल्या सभेसाठी सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना आव्हान करण्यात येते की, तेलंगणामध्ये शेतकऱ्यांसाठी तसेच महिला व बेरोजगार तरुणांसाठी लाभलेल्या योजना त्यात प्रामुख्याने 24 तास वीज पुरवठा, शेतीसाठी मोफत पाणीपुरवठा, खरीप आणि रब्बी साठी दरवर्षी पाच हजार रुपये एकरी भाग भांडवल, शेतीसाठी मोफत पाणी, पाच लाखाचा विमा, शेतमालाच्या शेवटच्या कणापर्यंत हमीभावाने शेतात खरेदी अशा अनेक शेतकरी हिताच्या योजना राबवून शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने सुखी करणारा यशस्वी प्रयोग तेलंगणाचे माननीय मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे एक व्यासपीठ म्हणून भारत राष्ट्र समिती या राष्ट्रीय पक्षाची घोषणा केली आहे व त्याची पहिली सभा घेण्याचा महाराष्ट्रातील नांदेड येथील मिळणार आहे. या सर्व बाबीच्या अनुषंगाने आम्ही आपणास आवाहन करतो की, नाशिक, नंदुरबार, जळगाव, नगर व धुळे जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधव व शेतकरी चळवळीतील शेतकऱ्यांच्या उत्कर्षासाठी लढणाऱ्या सर्वांना सदस्याचे नानासाहेब बच्छाव यांनी केले आहे.


