आपल खान्देशमहाराष्ट्रराजकीय
नांदगाव विधानसभा मतदारसंघात झालेल्या विकास कामाचा अहवाल मुख्यमंत्री यांच्याकडे सादर
मुक्ताराम बागुल- नांदगाव तालुका प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुहास अण्णा कांदे यांनी नांदगाव विधानसभा मतदारसंघात झालेले विकास कामाचा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर केला.
नांदगाव विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात झालेल्या व सुरु असलेल्या विकास कामांचा अहवाल ‘बदल घडतोय बदल दिसतोय” या पुस्तकाच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर केला. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कार्य अहवाल सादर करताना नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे व युवा सेना जिल्हाप्रमुख फरहान दादा खान यांची उपस्थिती होती.


