कवी रमेश धनगर यांची वर्धा येथील साहित्य संमेलनासाठी निवड
झूम मराठी ऑनलाईन न्यूज मीडिया
भडगाव ( कैलास सोनवणे) भडगाव येथील कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचालित जवाहर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक तथा कवी रमेश विरभान धनगर यांची वर्धा येथील ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात काव्य वाचनासाठी निवड झाली आहे.
येत्या ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्धा येथे होणार आहे. संमेलनातील कवी कट्ट्यासाठी कवी रमेश विरभान धनगर यांची निवड झाली आहे. संमेलनात दिनांक ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ‘बापाचं प्राक्तन’ या कवितेचे ते वाचन करणार आहेत. त्यांनी यापूर्वी डोंबिवली, नाशिक, उदगीर येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात काव्यवाचन केले आहे. अनेक राज्यस्तरीय अहिराणी मराठी कवी संमेलनात निमंत्रित कवी म्हणून त्यांचा सहभाग असतो. तसेच महाराष्ट्र साहित्य परिषद, खान्देश साहित्य परिषद, अखिल भारतीय अहिराणी साहित्य अकादमी, खान्देश साहित्य संघ अश्या संस्थावर त्यांनी काम केले आहे.

