महाराष्ट्रराजकीय

आगामी निवडणुकीत शिवसेनेने २ खासदार, २० आमदार निवडून आणावेत; भाजपाचे ओपन चॅलेंज

मुंबई : विधानसभा निवडणुकीत पाचपैकी चार राज्यांत भाजपा आघाडीवर आहे. पंजाबमध्ये काँग्रेसला धक्का देत आम आदमी पक्षाने सत्ता काबीज केली आहे. चार राज्यांत आघाडी घेतल्यानंतर भाजपा नेत्यांच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. भाजपा नेत्यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर ‘यूपी तो झाँकी है, महाराष्ट्र अभी बाकी है’ अशा घोषणा दिल्या. अशातच भाजपा नेते गिरीश महाजन यांनी शिवसेनेला खुले आव्हान दिले आहे.

भाजपाच्या या यशामुळे राज्यातील नेत्यांचाही आत्मविश्वास वाढला आहे. या निकालामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाला बळ मिळाले आहे. या निकालावरून जनतेचा भाजपवर विश्वास असल्याचे दिसून येते. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व देशाने स्वीकारले आहे. भाजपाने आघाडी घेतल्यानंतर गिरीश महाजन यांनी “उत्तरप्रदेश झांकी हैं, महाराष्ट्र अभी बाकी आहे.” अशी घोषणा केली. महाविकास आघाडीच्या नेत्यांसाठी हा इशारा मानला जात आहे. काँग्रेस पक्षाला पाच राज्यांत ३५ जागाही मिळणार नसल्याचा दावा महाजन यांनी केला आहे.

भाजपाच्या पाठीत खंजीर खूपसून शिवसेना पक्ष सत्तेवर आला आहे. आता आगामी निवडणुकीत शिवसेनेने २ खासदार आणि २० आमदार निवडून आणून दाखवावेत, असे आव्हान गिरीश महाजन यांनी शिवसेनेला दिले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे