फडणवीसांनी बॉम्ब फोडताच गोटे म्हणाले, ‘म्हणजे खाजगीत बायकांशीही बोलायचं नाही’
रश्मी शुक्ला यांच्यावर करण्यात आलेले फोन टॅपिंगचा आरोपांचा हवाला देत अनिल गोटे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.
झूम मराठी
धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या आरोपानंतर एकेकाळी भाजपचे आमदार राहिलेले अनिल गोटेही संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. मात्र फडणवीसांनी केलेल्या आरोपानंतर अनिल गोटे चिंतेत आले असून, जुजबी प्रतिक्रिया देत त्यांनी आरोप फेटाळण्याचे प्रयत्न केले. फडणवीसांनी केलेले आरोप गोटे यांनी फेटाळून लावले. फोन टॅपिंगवरुन त्यांनी व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला घातला जात असल्याचे म्हणत ‘उद्या आम्ही खासगीत आमच्या बायकांशीही बोलायचं नाही का’ असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
अनिल गोटे म्हणाले, फडणवीस यांनी केलेल्या आरोपांवर अनिल गोटे म्हणाले, माझं नाव घेतलं याबाबत मी त्यांचा आभारी आहे, याशिवाय मला त्यांच्याबद्दल बोलताच आलं नसतं. आम्ही कुणाला अडकवण्यासाठी तिथे बसलो होतो असे फडणवीस म्हणाले. माझ्या एका केसबाबत मी तिथं बसलो होतो. चव्हाण नावाचे वकील जे आहेत, ते आमच्या धुळ्याला सातत्यानं येत होते. त्यामुळे त्यांना भेट घ्यायला गेलो होतो. पण देवेंद्र फडणवीस यांना एवढी काय पडली आहे की तिथे जाऊन शूटिंग करायला लावलं? म्हणजे कुणी आपआपसामध्ये बोलूही नये. केंद्र सत्तेचा दुरुपयोग करते, ते यातूनच सिद्ध होतं.
रेकॉर्डिग केल्याच्या बाबीवरुनही अनिल गोटे यांनी आक्षेप घेतलाय. रश्मी शुक्ला यांच्यावर करण्यात आलेले फोन टॅपिंगचा आरोपांचा हवाला देत अनिल गोटे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. फडणवीस यांनी तो फोन अनिल गोटेंना करण्यात आला असल्याचा दावा केला होता. त्यावरुन अनिल गोटे यांनी सर्व आरोप फेटाळू लावले आहेत. तसंच खासगीत आता आम्ही आमच्या बायकांशीही बोलायचं नाही? असाही सवालही उपस्थित केला आहे.



