ब्रेकिंग

महाराष्ट्रातील ‘या’ तीन महिलांना ‘नारी शक्ती पुरस्कार’ जाहीर ; राष्ट्रपतींच्या हस्ते होणार सन्मान

झूम मराठी वृत्तसेवा

आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालयाने ‘नारीशक्ती पुरस्कारा’ची घोषणा करण्यात आली आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 28 महिलांना सोमवारी ‘नारीशक्ती पुरस्कार’ जाहीर झाला आहे. हे पुरस्कार वर्ष 2020 व 2021 साठीचे आहेत. आज (ता.आठ मार्च) राष्ट्रपती भवनात हाेणा-या या कार्यक्रमात महाराष्ट्रातील तीन महिलांचा देखील या पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे.

महाराष्ट्रातील तीन महिलांमध्ये कथक नृत्यांगना डाऊन सिंड्रोमप्रभावित सायली आगवणे, वनिता बोराडे या पहिल्या महिला सर्पमित्र यांना वर्ष 2020 साठी तर वर्ष 2021 साठी सामाजिक उद्योजिका कमल कुंभार यांना नारी शक्ती पुरस्कार जाहीर झाला आहे. मंगळवारी आज आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्यादिवशी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती भवन येथे आयोजित कार्यक्रमात पुरस्काचे वितरण करण्यात येणार आहे. सन 2020 च्या नारी शक्ती पुरस्कार विजेत्यांमध्ये उद्योजकता, कृषी, नवकल्पना उपक्रम, सामाजिक कार्य, कला आणि हस्तकला, एसटीईएमएमआणि वन्यजीव संवर्धन अशा विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या महिलांचा समावेश आहे. तसेच 2021च्या नारी शक्ती पुरस्कार विजेत्या महिलांमध्ये भाषाशास्त्र, उद्योजकता, कृषी, सामाजिक कार्य, कला आणि हस्तकला, मर्चंट नेव्ही, एसटीईएमएम, शिक्षण आणि साहित्य, दिव्यांग अधिकारासाठी कार्य करणा-या महिला यांचा समावेश आहे.

कोरोना महामारीमुळे वर्ष 2020 च्या पुरस्कारांचे वितरण होऊ शकले नव्हते. 8 मार्च रोजी वर्ष 2020 आणि 2021 च्या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. या कार्यक्रमास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्री तसेच अन्य मंत्री वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील. या कार्यक्रमामध्ये एकूण 28 पुरस्कार, (वर्ष 2020 आणि 2021 साठी प्रत्येकी 14) एक पुरस्कार संयुक्तपणे दोन महिलांना देण्यात येणार आहे. समाजातल्या असुरक्षित आणि उपेक्षित महिलांच्या सक्षमीकरणासाठी विशेष सेवा कार्य करणा-या महिलांच्या बहुमोल कार्याची घेतलेली दखल म्हणून महिलांना हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे