आपल खान्देशब्रेकिंगराजकीय

Jalgoan MC | जळगावात महायुतीचे १२ नगसेवक बिनविरोध..

 

जळगाव | सत्ताधारी भाजपा-शिंदेसेना युतीने राज्यात होत असलेल्या महापालिका निवडणुकीमध्ये विजयाचे खाते उघडले आहे. अर्ज माघारी घेण्याची मुदत संपल्यानंतर अनेक ठिकाणी भाजपाचे दोन अंकी उमेदवार बिनविरोध विजयी झाले. तर शिंदेसेनेनेचे उमेदवारही बऱ्याच ठिकाणी बिनविरोध विजयी झाले आहेत. जळगावमध्ये युतीने १२ जागांवर बिनविरोध विजय मिळवला आहे.

अनेक वर्षांनंतर राज्यात महापालिकांच्या निवडणुका होत आहे. २९ महापालिका निवडणुकामुळे राज्याचे राजकीय वातावरण तापले असून, अर्ज माघारी घेण्यापर्यंत अनेक ठिकाणी गोंधळ बघायला मिळाला. अनेकांनी बंडखोरी केली. मात्र, अर्ज माघारी घेतल्यामुळे अनेक ठिकाणी मतदानापूर्वीच उमेदवारांच्या गळ्यात विजयाची माळ पडली आहे.

जळगाव महापालिकेमध्ये भाजपा-शिंदेसेनेचे १२ उमेदवार विजयी झाले आहेत. यात भाजपाचे सहा, शिंदेसेनेच्या सहा उमेदवारांचा समावेश आहे.  भाजपाचा एक, तर शिंदेसेनेचे तीन उमेदवार बिनविरोध विजयी झाले. त्यात शुक्रवारी म्हणजे अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी भर पडली.

बिनविरोध विजय उमेदवारांची नावे

  • उज्ज्वला बेंडाळे, भाजपा
  • दीपमाला काळे, भाजपा
  •  विशाल भोळे, भाजपा
  • विरेन खडके, भाजपा
  • अंकिता पंकज पाटील भाजप
  •  वैशाली अमित पाटील, भाजपा
  • गौरव सोनवणे, शिंदेसेना  
  • सागर सोनवणे, शिंदेसेना  
  • गणेश सोनवणे, शिंदेसेना
  • रेखा पाटील, शिंदेसेना
  • मनोज चौधरी, शिंदेसेना
  • प्रतिभा देशमुख, शिंदेसेना

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे