महाराष्ट्र

किराणा दुकाने ४ तासच खुली राहणार, विनाकारण फिरणाऱ्यांमुळे संचारबंदी कडक होणार – टोपे

झूम मराठी न्यूज वेब मीडिया 

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकार दुकानांच्या वेळेबाबत लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. राज्यातील किराणा मालकाची दुकाने फक्त ४ तास खुली ठेवण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली. राज्यात संचारबंदी असून सुद्धा लोकांची गर्दी वाढत आहे, विनाकारण लोकं किराणा मालाच्या नावाखाली फिरत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत किराणा मालाच्या दुकाने नियोजित वेळेनुसार खुली ठेवण्याचा निर्णय होणार आहे. तसेच विनाकारण फिरणाऱ्यांमुळे संचारबंदी कडक होणार असल्याचे संकेत राजेश टोपे यांनी यावेळी दिले.

राजेश टोपे म्हणाले की, वाढत असलेली संख्या लक्षात घेऊन जे काही छोटे जिल्हे किंवा दुर्गम भागातील जिल्हे असतील. तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांचा संपर्क रोज मंत्रालयाशी होत नाही. अशा ठिकाणी पालक सचिवांनी अधिक सक्रिय राहून काम केले पाहिजे. जे पालक सचिन ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये नेमलेले असतील त्या सर्व पालक सचिवांनी सक्रियपणे काम करावे आणि आपापल्या जिल्ह्यातील संपूर्ण कोविड संदर्भात नियंत्रण ठेवावे. तसेच वाढत असलेली गर्दी आणि सध्या परिस्थिती पाहता ३० तारखेपर्यंत संचारबंदी अधिक जास्त कडक केली पाहिजे. उद्देश साध्य करायचा असेल तर विनाकारण फिरणाऱ्या लोकांना पायबंद केले पाहिजे. त्यासाठी खासकरून किराणा दुकाने खुली ठेवण्यासाठी वेळ दिली पाहिजे. सकाळी ७ ते ११ अशाप्रकारे ४ चार किराणा दुकाने उघडी ठेवायला पाहिजे. परंतु याचा अर्थ दिवसभर किरणाच्या नावाखाली बाहेर पडत राहणं हे योग्य नाही. अशा पद्धतीची चर्चा आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा करण्यात आली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे