कृषीवार्ता

अवकाळी पाऊस , दाट धुक्याने बळीराजा चिंतेत

अवकाळी पाऊस , दाट धुक्याने बळीराजा चिंतेत

नांदगाव (प्रतिनिधी) मुक्ताराम बागुल- अवकाळी पाऊस , संध्या असलेले ढगाळ वातावरण, आणि ताठ दुखी याचा सर्वात जास्त फटका कांदा पिकाला बसला असून कांद्यावर मवा, करपा यासारख्या रोगाचा प्रादुर्भाव पडला आहे. कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटात बळीराजा सापडला असून औषध मारून देखील पीक हातात येत नसल्याने काय करावे अशी चिंता सतावत आहे.

तसेच एकरी 40 ते 45 हजार रुपये खर्च होत असून लागवड खर्चही निघत नसल्याने घेतलेले कर्ज फेडायचे कसे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

कधी दुष्काळ कधी अतिवृष्टी तर कधी अवकाळी पाऊस या निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसत असून सध्या कांदा पिकांची पूर्णपणे हानी झाल्याचे चित्र तुमच्यासह नाशिकच्या ग्रामीण भागात बघावयास मिळत आहे.

मागील काही दिवसात झालेल्या पावसाने मका पिकास कांद्याची मोठ्या प्रमाणावर हानी केली आहे ढगाळ वातावरण व पडत असलेली दात दुखी यामुळे कांदा पिकावर मावा करपा यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे त्यामुळे कांद्याची वाढ होत नाही तर पाप देखील पिवळी पडली आहे तसेच काढून ठेवलेला कांदा देखील सोडून गेला असल्याने बळीराजा पुन्हा संकटात सापडला आहे नांदगाव तालुक्यात जवळपास पाच हजार दोनशे एकर क्षेत्रात कांद्याची लागवड करण्यात आली असून या खराब वातावरणामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाढला आहे औषध फवारणी करून बळीराजा हैरान झाला असल्याचे कृषी अधिकारी जगदीश पाटील यांनी म्हटले आहे.

शेतकर्‍यांनी वेळेवर फवारणी करावी. मागे झालेल्या अवकाळी पावसाने सध्या हवामानात बदल होत आहे. ढगाळ वातावरण दाढ दुखी यामुळे मावा करपा या रोगाचा कांद्यावर परिणाम होत आहे शेतकऱ्यांनी काळजी न करता वेळच्या वेळी लागणारे औषध फवारणी करावी यामुळे पिकांची वाढ होण्यास मदत होईल तसेच उत्पादनात देखील वाढ होईल जगदीश पाटील नांदगाव तालुका कृषी अधिकारी

लागवडीचा खर्चही निघत नाही मी साडेचार एकर कांदे लावले आहे अवकाळी पावसाने कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे उन्हाळ कांदा लावले आहेत त्यावर देखील लवकर पास सारखे रोग पडले आहेत एक एकराला साधारणतः 40 ते 25 हजार रुपये खर्च येतोय एक ते सव्वा लाख रुपये मध्ये उत्पन्न अपेक्षित असते मात्र सध्या असलेल्या परिस्थितीनुसार लागवडीचा खर्चही सुटत नाही कर्ज कसे करावे हे मोठे संकट डोळ्या समोर उभे आहे. एकनाथ जाधव शेतकरी यांची व्यथा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे