पुणे संचालक कार्यालय येथे नाशिक विभागातील तपासणीत त्रूटीमुळे अपात्र झालेल्या अघोषित प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक शाळा व नैसर्गिक वाढीच्या तुकड्यांच्या त्रूटी पूर्तता व हरकतीची सुनावणी कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.
या कॅम्पला विभातील एकही शाळा पुन्हा अपात्र होऊ नये व शिक्षक भावांचे आयुष्याचे नुकसान होऊ नये म्हणून महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन च्या राज्याध्यक्षा मा शुभांगी ताई पाटील या स्वतः उपस्थित होत्या व तपासणी प्रसंगी स्वतः हजर राहून कोणावरही अन्याय होऊनये याची काळजी घेतली. व अनेक शिक्षकांना न्यायमिळवून दिला*
*या प्रसंगी शुभांगी ताई त्यांच्या सोबत महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनचे राज्य उपाध्यक्ष मा विवेक पाटील सर,राहूल पाटील सर ,संस्था चालक मा नानासाहेब पाटील,डॉ शांताराम पाटील,सुरेश शेवाळे सर,मोहन अहिरे सर,भदाणे सर, वळवी सर , आदी उपस्थित होते
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा