पाचोरा तालुक्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत भाजपचे वर्चस्व
पाचोरा प्रतिनिधी : तालुक्यात भाजप तालुकाध्यक्ष अमोलभाऊ शिंदे यांनी सत्ताधारी शिवसेना व राष्ट्रवादी यांना सुरूंग लावत तब्बल १८ जागांपैकी १० जागांवर भाजप’चा झेंडा रोवत पाचोरा तालुक्यातील जनता अमोल भाऊ शिंदे यांचे नेतृत्व मान्य करायला सुरुवात केली आहे.
तालुक्यात १८ पैकी १० जागांवर विजय हा शिवसेना व राष्ट्रवादी पक्षांसाठी चिंतेचा विषय असून आगामी होऊ घातलेल्या पाचोरा – भडगाव नगरपालिका’साठी धक्का आहे.एकाप्रकारे आगामी निवडणुकीत सर्व टक्कर काट्याची होईल असे या निवडणुकीतुन दाखवण्याचा प्रयत्न अमोल भाऊ शिंदे यांचा आहे.
भाजप’ तालुकाध्यक्ष युवानेते अमोल शिंदे यांचे नेतृत्व मान्य करायला जनतेने सुरूवात केली असुन आगामी नगरपालिका सह जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी हि शिवसेना व राष्ट्रवादी’साठी धोक्याची घंटा आहे. शिवसेना व राष्ट्रवादी या पोट निवडणुकी’च्या निकालानंतर काय स्पष्टीकरण देते किंवा कसे बघते? याकडे जनतेसह राजकीय जाणकारांचे लक्ष लागुन राहिल.



