IMC या हर्बल कंपनीच्या वतीने पाच्छापूर येथे आरोग्य शिबीर घेण्यात आले
राहुल महाडिक-जिल्हा प्रतिनिधी
सुधागड (प्रतिनिध) IMC हर्बल या कंपनी द्वारे आयुर्वेदिक औषधी उत्पादनाचे आरोग्य शिबीरद्वारे पाच्छापूर गावामध्ये नागरिकांना गंभीर शारीरिक आजारावरती आयुर्वेदिक औषधं उपचार किती महत्वाचे असतात तसेच ग्रामीण जीवनामध्ये तात्पुरते केमिकल औषध किती घातक असु शकते या विषयी बोलताना कंपनीचे डॉक्टर जयेश पाटील सर यांनी आजारी पडण्याची वाट न पाहता पहिलेच आपले शरीर आजारापासून तंदुरुस्त ठेऊन गंभीर आजारांवर मात कशी करू शकतो या विषयी मार्गदर्शन केले, तसेच IMC कंपनीचे दर्जेदार उत्पादन्नाविषयी डेमो दाखवुन माहिती देण्यात आली.


या शिबिरासाठी रिटायर नायब तहसीलदार मनोहर कदम साहेब व त्यांच्या पत्नी मिनल कदम या उपस्थित होत्या,तसेंच IMC कंपनीचे औषध्ये हवे असल्यास कर्मचारी रविंद्र हलदे यांच्याकडून उपलब्ध होतील, या कार्यक्रमाला पाच्छापूर ग्रामपंचायतिचे ग्रामसेवक राहुल कांबळे साहेब, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक राणे गुरुजी, ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल बावधाने, चंद्रकांत शिद, प्रविण ओंबळे, मोरेश्वर हाळंदे, मीनाक्षी आंबरे तसेंच पाच्छापूर, पंचशीलनगर, रामवाडी, दर्यागाव येथील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




