कृषीवार्तामहाराष्ट्र

शेतकऱ्यांना आता महावितरणचा ‘शॅाक’, कृषीपंपासाठी वेगळा नियम, ऐन रब्बीच्या तोंडावर निर्णय

शेतकऱ्यांना आता महावितरणचा ‘शॅाक’, कृषीपंपासाठी वेगळा नियम, ऐन रब्बीच्या तोंडावर निर्णय

निलेश पाटील कार्यकारी संपादक 

आाता नवेच संकट शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. आतापर्यंत शेतीसाठी 10 तास वीजपुरवठा केला जात होता. मात्र, ऐन रब्बीच्या तोंडावरच यामध्ये बदल करण्यात आला असून आता केवळ 8 तास वीजपुरवठा राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये वाढ होणार आहे नैसर्गिक संकटाचा सामना करताना शेतकऱ्यांची दमछाक सुरु आहे. पावसामुळे पिकाचे नुकसान झाले आहे. 

बाजारपेठेत शेतीमालाला योग्य दर नाही अशा अवस्थेत देखील रब्बी हंगामाच्या पेरणीला सुरवात झाली आहे. असे असताना आाता नवेच संकट शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे

आतापर्यंत शेतीसाठी 10 तास वीजपुरवठा केला जात होता. मात्र, ऐन रब्बीच्या तोंडावरच यामध्ये बदल करण्यात आला असून आता केवळ 8 तास वीजपुरवठा राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये वाढ होणार आहे. रब्बी पिकांची जोपासना करण्यासाठी यंदा शेतकऱ्यांकडे मुबलक प्रमाणात पाणीसाठा आहे.

पावसामुळे पिकांनाही पाणी मिळते मात्र, रब्बी हंगामातील पिकांची जोपासना ही साठवूकीच्या पाण्यावरच करावी लागते. यातच सध्या वाढत्या ऊनामुळे पेरणी करण्यापूर्वी आणि पेरल्यानंतरही पाणी द्यावे लागणार आहे. आतापर्यंत 10 तास वीजपुरवठा केला जात होता. मात्र, 1 नोव्हेंबरपासून नियमात बदल करुन शेतीसाठी 8 तासच विद्युतपुरवठा राहणार आहे.यामुळे घेण्यात आला निर्णय महावितरणच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना कमी वेळेत अधिकचे भरणे कसे होईल याचे नियोजन करावे लागणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे