गुन्हेगारी
मनमाड रेल्वे स्टेशनवर तरुणाचा निर्घृण खून!!
सर्वत्र दिवाळीचा उत्साह सुरु असताना नाशिक जिल्ह्यातील मनमाडमध्ये धक्कादायक घटना घडलीय. मध्यरात्रीच्या सुमारास एका तरुणाची हत्या करुन चार ते पाच तरुण फरार झाले आहेत.
नांदगाव (प्रतिनिधी – मुक्ताराम बागुल) तालुक्यातील मनमाड येथील रेल्वे स्टेशनवर चार ते पाच जणांच्या टोळीने एका तरुणाची निर्गुणपणे हत्या केल्याची खळबळ जनक घटना दिनांक शनिवारी मध्यरात्री मनमाड स्टेशनवर घडली असुन शिवम पवार ( रा.उसवड ता.चांदवड ) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मनमाड रेल्वे स्थानकावर नंदी ग्राम एक्सप्रेस उभी होती. त्यावेळी 4 ते 5 तरूणांनी शिवम याच्यावर धारदार हत्याराने सपा-सप 5 ते 6 वार केले. त्यामुळे तो तरुण रक्त बंबाळ झाला. त्याला तातडीने उपजिल्हा ग्रामीण रुग्णलयात दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत त्या तरणाचा मृत्यु झाला होता. हत्या केल्यानंतर मारेकरी नंदी ग्राम एक्सप्रेसने मुंबई कडे फरार झाले. ही घटना प्रेम प्रकरणतुन घडली आसल्यची माहिती समोर आली आसुन त्यामुळे ही हत्या करण्यात आली.
ही घटना घडली तेव्हा ती मुलगी देखील त्या ठिकाणी होती. त्या मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले असुन चौकशी करत आहे.त्या नंतर त्या खुनाचे कारण काय याचा उलगडा होईल. शिवमला तीन बहिणी आसुन भाऊबीजीचे दिवशी भावाचा खुप झाला आसल्यने त्याच्या वर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कल्याण येथून आरोपी व सदर मुलगी मनमाडला आले होते.
इन्स्टाग्राम वर फेक आयङी काढुन आमची बदनामी करतो असे आरोपीचे म्हणने होते तर शिवमला समोरा समोर भेटुन सर्व गैरसमज दुर करू आसे म्हणुन मला आणले होते. असे त्या मुलीचे म्हणने होते असे तिने दिलेल्या फिर्यादीत नमुद केले आहे. हा सदर प्रकार सीसी टिव्ही मध्ये कैद कैद झाला आसुन लवकरच आरोपींना अटक करण्यात येइल असे पोलिस सूत्रांनी सांगितले आहे
या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी भादंवि 302/34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आल्या नंतर आरोपीला पकडण्यासाठी कल्याण,उल्हास नगर भागात पथक पाठविण्यात आले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक जांगदड करीत आहे.




