गुन्हेगारीब्रेकिंग

खळबळजनक – माजी सैनिकाची हत्त्या करून, १ लाख ६ हजाराची रोकड लंपास…

 मुक्ताईनगर तालुक्यातुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. माजी सैनिकाची हत्त्या करून जवळील १ लाख ६ हजाराची रोकड लांबविल्याची घटना वडोदा ते हलखेडा दरम्यानच्या शिवारात घडलीय. प्रल्हाद शिवमराम पाटील (वय-५२) रा. सावर्डे ता. कागल जि. कोल्हापूर असे मयत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेने खळबळ उडाली असून याबाबत मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अनोळखी सहा ते सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयत प्रल्हाद पाटील हे माजी सैनिक असून ते  त्यांच्या गावातील मित्र अनिल आनंदा निकम यांच्यासोबत कारने शेगांव दर्शनासाठी ५ नोव्हेंबर रोजी निघाले होते. दरम्यान प्रल्हाद पाटील यांचा हलखेडा (ता.मुक्ताईनगर) येथे ओळखीचा व्यक्ती असून त्यांना भेटून ते शेगाव दर्शनाला जाणार होते. रात्री ९ वाजता प्रल्हाद पाटील यांनी एका मित्राला फोन करून बोलाविले. त्यावेळी एकजण त्यांना घेण्यासाठी दुचाकी घेवून आला. दुचाकीवर प्रल्हाद पाटील आणि अनिल निकम हे बसून मुक्ताईनगर तालुक्यातील वढोदा गावाजवळील तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या वढोदा ते हलखेडा जंगलात गेले.त्याठिकाणी आगोदर ६ साथीदार जण उपस्थित होते. यावेळी प्रल्हाद पाटील आणि पवार आडनाव असलेल्या तरूणांचा पैश्यांवरून बाचाबाची झाली. यात प्रल्हाद पाटील यांनी पुतण्या यांच्या फोन पे वरून ५५ हजार रूपये दिले. त्यानंतर त्यांच्या सोबत असलेले काही रक्कम असे एकुण १ लाख ६ हजार ५०० रूपये दिले. पुन्हा पैश्यांच्या वादावरून हाणामारी झाली. दोघांना जखमी करून अनोळखी ६ ते ७ जण घटनास्थळाहून पसार झाले.

जखमी झालेले प्रल्हाद पाटील यांना उपचारार्थ दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. अनिल निकम यांच्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात सहा ते सात जणांविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहूल खताळ करीत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे