महाराष्ट्र

वाचा सुधारित नियमावलीनुसार काय सुरु काय बंद; महत्त्वाचे १० नियम

राज्य मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण बैठक आज पार पडली. या बैठकीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. राज्यातील हॉटेल व्यावसायिकांसाठी दिलासादायक निर्णय देखील घेण्यात आला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारपरिषदेत याबाबत माहिती दिली आहे.

  • 1) १५ ऑगस्टपासून राज्यभरातील हॉटेल, रेस्टॉरन्ट, मॉल्सही रात्री १० वाजपेर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी

  • 2) कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेतलेल्यांन्याच मॉलमध्ये प्रवेश असणार

  • 3) धार्मिकस्थळ व सिनेमागृह पुढील आदेशापर्यंत बंदच राहणार

  • 4) लोकल ट्रेन्सबाबत आता डबल डोस आणि दुसऱ्या डोस नंतरचे १४ दिवस झालेले असणे आवश्यक

  • 5) नियम न पाळणाऱ्यांना ५०० रुपये दंड व कायदेशीर कारवाई देखील होऊ शकते

  • 6) उपाहारगृहांना त्यांच्या क्षमतेच्या ५० टक्क्यांपर्यंत मान्यता

  • 7) खुल्या प्रांगणात किंवा लॉनमध्ये या ठिकाणी होणारे जे विवाहसोहळ्यांना २०० व्यक्तींनाच परवानगी आणि हॉलमध्ये असेल तर जी आसन क्षमता असेल त्याच्या ५० टक्के परवानगी किंवा १०० या पेक्षा जास्त नाही.

  • 8) २४ तास खासगी कार्यालये सुरू राहू शकतील. एकाच वेळी गर्दी करण्यापेक्षा या खासगी कार्यलायांनी त्यांच्या गरजे प्रमाणे एका सत्रात २५ टक्क्यांपर्यंत उपस्थिती ठेवली तर, आपल्याला खासगी कार्यालये सुरू ठेवता येतील, अशी सूचना देण्यात आलेली आहे.

  • 9) सर्व दुकानांना रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी

  • 10) सिनेमा व मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे पुढील आदेशापर्यंत तूर्त तरी सुरू करण्यास परवानगी नाही. धार्मिक स्थळांना देखील तूर्त बंदी

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे