मुंबई | राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना सध्या ईडीला सामोरं जावं लागतंय. त्यांच्या या चौकशी वरून राजकीय वातावरणात अनेक खळबळ माजली आहे. ‘एकनाथ खडसे यांची चौकशी ईडीच्या माध्यमातून सुडबुद्धीने व राजकीय हेतूने सुरु आहे’, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. तसेच, एकनाथ खडसे हे चौकशीला सामोरे जाताना यंत्रणेला सहकार्य करत आहेत. त्यांनी काही केले नाही, त्यामुळे ते घाबरत नाहीत, असे नवाब मलिक म्हणाले.
खडसेंचं खच्चीकरण केलं जातंय
ईडीचे सत्र आता एकनाथ खाडेंसीच्या मागे लागल्यामुळे त्यांची चौकशी होत आहे, त्याचाच आधार घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांचे खच्चीकरण करत आहे. त्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशीही झाली. आता ईडीच्या माध्यमातून सुडबुद्धीने व राजकीय हेतूने चौकशी सुरू असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.याचबरोबर, ईडी किंवा इतर यंत्रणेमार्फत कितीही चौकशा लावल्या तरी सत्य आज ना उद्या समोर येणार आहेच. एकनाथ खडसे हे या चौकशांना सामोरे जाताना यंत्रणेला सहकार्य करत आहेत. त्यांनी काही केले नाही त्यामुळे ते घाबरत नाहीत. यंत्रणांच्या माध्यमातून लोकांवर दबाव निर्माण करुन राजकीय गणितं बदलतील तर तो भाजपाचा गैरसमज आहे, अशी टीका नवाब मलिक यांनी केली.
एकनाथ खडसे यांची तब्बल 9 तास चौकशी
पुण्यातील भोसरी जमीन घोटाळ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे अडचणीत सापडले आहेत. ईडीने समन्स बजावल्यानंतर एकनाथ खडसे गुरुवारी सकाळी ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले होते. तब्बल नऊ तासांनंतर खडसे ईडी कार्यालयातून बाहेर आले. यावेळी एकनाथ खडसे यांनी स्वतः माध्यमांशी बोलणे टाळले. मात्र, एकनाथ खडसे यांच्या वकिलांनी प्रसारमाध्यमांना सविस्तर माहिती दिली. आम्ही ईडीला सर्वप्रकारे सहकार्य केले, ईडीने मागितलेली सर्व कागदपत्र दिली, काही कागदपत्र देण्यासाठी 10 दिवसांची मुदत मागितल्याची माहिती एकनाथ खडसे यांच्या वकिलांनी दिली. तसेच चौकशीला सहकार्य करण्याचे आश्वासन एकनाथ खडसे यांनी दिल्याचेही वकिलांनी सांगितले
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा