कृषीवार्ता

महाराट्र शासन, कृषी विभागामार्फत २१ जुन ते १ जुलै २०२१ या कालावधीत कृषि संजिवनी मोहिम

महाराट्र शासन, कृषी विभागामार्फत २१ जुन ते १ जुलै २०२१ या कालावधीत कृषि संजिवनी मोहिम राबविण्यात येते आहे

   या मोहिमे अंतर्गत धुळे तालुक्यातील विविध गावांना कृषि विभागाचे अधिकारी कर्मचारी, कृषि विज्ञाण केंद्र, धुळेचे शास्त्रज्ञ भेटी देत असून खरीप हंगामात आमलात आनावयाच्या तंत्रज्ञाना विषयी प्रत्यक्ष प्रक्षेत्रावर जाऊन मार्गदर्शन करत आहेत.

 दि. २१/०६/२०२१ रोजी मौजे मोराणे प्र.ल. येथे बि.बि.एफ. लागवड तंत्रज्ञानावर आधारीत पेरणी यंत्राच्या सहाय्याने पेरणीचे प्रात्यक्षीक प्रत्यक्ष प्रक्षेत्रावर करुन घेण्यात आले.आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मा. पंचायत समिती सदस्य श्री शिरीषदादा सोनवणे यांची निवड सर्वानुमते होउन कार्यक्रमाचे व्यवस्थापण श्री ऋषीबाबा ठाकरे यांनी केले.

या कार्यक्रमात पेरणीपुर्वी बिजप्रक्रियेचे महत्व कृतिसह करुन दाखवण्यात आले. बि.बि.एफ. तंत्रज्ञानावर आधारीत पेरणीयंत्राच्या सहाय्याने पेरणी केल्यास होणारे फायदे श्री. पी.जे. पाटील, प्र. मंडळ कृषि अधिकारी, कुसुंबा यांनी विषद केले.

शेतकऱ्यांना बिज प्रक्रिये चे महत्व व त्यातुन रासायणिक खतांच्या खर्चात बचत करणे संबधी मार्गदर्शन श्री चेतन शिरसाठ कृषि सहाय्यक यांनी कृतिसह विषद केले. कापुस,मका,ज्वारि ई. पिकांना ॲझोटोबँक्टर व तुर,मुग,सोयाबीन ,उडिद ई.कडधान्य पिकांना रायझोबियमची बिजप्रक्रीया केल्यास उत्पन्नात १५%पर्यत वाढ दिसुन येत असल्याचे कृषि विद्यापिठातंर्गत झालेल्या संशोधनातुन सिध्द झाले आहे.तसेच जे शेतकरी सोयाबीन लागवडीसाठी घरचे बियाणे वापरतील त्यांना उगवण क्षमता चाचणी करण्याबाबत सुचित करुन तसे प्रात्यक्षिके दाखविण्यात येत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती श्री यशवंत वाघ यांनी उपस्थित शेतक-यांनी दिली. श्री आर. व्ही. बोरसे कृषि पर्यवेक्षक यांनी माती परीक्षनासंबधी माहिती देतांना, माती परिक्षण आधारित खत व्यवस्थापन केल्यास उत्पादन खर्चात बचत होवुन जोमदार पिक येते व जमिनीचे आरोग्य चांगले राखण्यास मदत होते.जमिनीत जे अन्नद्रव्ये मुबलक आहे अशा खताचा अनावश्यक खर्च टाळता येतो.तसेच खतांमध्ये विद्राव्य खते देणे,शिफारशी प्रमाणे खते देणे,फवारणी करुन खते देणे ई.चा अवलंब केल्यास १०%पर्यत खताची बचत होवु शकते असे सांगण्यात आले. मंडळ कृषि अधिकारी, कुसुंबा श्री पी.जे. पाटील यांनी बीबीएफ (रुंद,सरि वरंबा)तंञज्ञानाच्या फायद्यां बाबत शेतकऱ्यांना अवगत करतांना, प्रामुख्याने बीबीएफ यंञाद्वारे उताराला आडवी पेरणी केल्यास मुलस्थानी जलसंधारण होण्यास मदत होते,आंतरपिक पध्दतीचा अवलंब केल्यास अधिकचे उत्पन्न घेता येते,बियाण्यात २० ते २५%बचत होते,उत्पन्नात ३०%वाढ दिसुन येते,वरंब्यावर ओलावा टिकवून ठेवला जात असल्याने पर्जन्यमान खंडाच्या कालावधीत सुध्दा पाण्याचा ताणाची तिव्रता कमी होते,जास्त पाऊस झाल्यास या पध्दतीमधील सरिमधुन अतिरिक्त पाणी वाहुन जाण्यास मदत होते,पिक घनता योग्य ठेवण्यास मदत होते व जोमदार वाढ होवुन पिक किड-रोगास बळि पडत नाही.

वरिलप्रमाणे मार्गदर्शन शेतकऱ्यांना परस्परातील सुरक्षित अंतर ई.दक्षता घेवुन करण्यात येत आहे. आजच्या कार्यक्रमाच्या आयोजनास कृषि सहाय्यक श्री अमोल पाटील, श्री संतोष भदाने, श्री अमोल राजपुत, श्री गणेश बोरसे, श्रीमती अश्विनी चौधरी, श्री प्रदिप कापडणे, श्री योगेश महाले, श्री किरण देवरे यांनी वशेष सहकार्य केले.सदर कार्यक्रमास श्री वाघ यांना जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री विवेक सोनवने,उपविभागीय कृषी अधिकारी श्री भालचंद्र बैसाने व तालुका कृषी अधिकारी श्री.जि समाधान व्यक्त केले जात आ.के. चाैधरी यांचे मार्गदर्शन लाभत आहे.खरिपाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांना अशा पध्दतीचे प्रात्यक्षिक देवुन मार्गदर्शन मिळत आहे

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे