आपल खान्देशगुन्हेगारी

धक्कादायक!!!भोंदु महाराज ने केली नवरदेवाची फसवणूक

जामनेर च्या भोंदु महाराज ने लग्न जमवून देतो चे आमिष दाखवून दुसखेडा च्या नवरदेवाची केली फसवणूक!

पाचोरा (प्रतिनिधी) – तालुक्यातील दुसखेडा येथील नवरदेवाची लग्नाच्या बोहल्यावर चढण्याआधीच नवरी मुलगी आलीच नाही म्हणून फसवणूक झाल्याचा प्रकार घडला आहे

या बाबत सविस्तर माहिती अशी की. जामनेर तालुक्यातील पळासखेडे गुजराचे या गावातील आरोपी राजेश्वर नारायण पाटील हा लग्न जमविण्याचे काम करतो पाचोरा तालुक्यातील दुसखेडा येथील रवींद्र प्रकाश पाटील याला व्हाटस्प वरुन एका मुलीचा फोटो टाकला आणि तुला ही मुलगी पंसद असेल तर तुझा विवाह या मुलीशी लावुन देतो असे सांगून नवरदेव मुला कडुन तब्बल एक लाख पन्नास हजार रुपये रोख मुलीचे दागिने आणि अजुन एका मध्यस्थी ला देण्यासाठी घेतले असता. नवरी घेऊन येतो असे आरोपीने विश्वासाने सांगितले म्हणून दुसखेडा येथे दि. २२ जुन २०२१ रोजी चि. रविंद्र चा विवाह सोहळा चे आयोजन करण्यात आले ठरल्या प्रमाणे हळद लावली गेली त्यानंतर दुसऱ्या दिवशी लग्न जमविणार्या बहाद्दर ने मोबाइल स्विच अॉफ करुन टाकला. विवाह साठी आलेल्या वर्‍हाडी नवरीची वाट बघुन थकुन गेले तेव्हा हे सर्व खोटे असल्याचे उघड झाले. आरोपी राजेश्वर हा फसवणूक करुन फेसबुक चे मुलींचे फोटो डाऊनलोड करून अशाच प्रकारे फसवणूक करीत आहे त्याच्या विरोधात पाचोरा पोलीसात भादवी ४२० प्रमाणे गुन्हा दाखल आज दि. ४ जुलै रोजी दुपारी करण्यात आला आहे. आरोपी पोलीसांच्था ताब्यात होता. पुढील तपास पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे.

 

https://youtube.com/shorts/FAwULj1_JfM?feature=share

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे