मुंबई : ओबीसींच्या आरक्षणासाठी आज (२३ डिसेंबर) रोजी वंचित बहुजन आघाडीने विधानभवनासमोर आंदोलन केलं. घोषणा देत विधानभवन परिसर दणाणून सोडला. अनेक कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली. त्यामुळे वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर आणि त्यांनी घोषणा केली “आता हे आंदोलन आम्ही गावपातळीपर्यंत घेऊन जाऊ.”
मोर्चा विधानभवन परिसरात आल्यानंतर पोलिसांचीही तारांबळ उडाली. पोलिसांनी जमाव पांगवायला सुरुवात केली. जमाव अधिक आक्रमक झाला. पोलिसांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. पोलीस आणि आंबेडकरांची चर्चा सुरू असतानाच निदर्शक घोषणा देत होते.
प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. या दोन्ही सरकारांना ओबीसींना आरक्षणच द्यायचे नाही, असा आरोप केला. मंडल आयोगापेक्षाही आता मोठी लढाई होणार आहे. आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही; राज्यभर घेऊन जाऊ. ओबीसींना राजकीय आरक्षण मिळालेच पाहिजे. ओबीसींची जातीनिहाय जनगणना केलीच पाहिजे. जनगणना केली तर राजकीय आरक्षणही आपोआप मिळेल, या सरकारने केवळ ओबीसीच नव्हे तर मराठा आरक्षणाचेही वाटोळे केले आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा