देश-विदेश
खा उन्मेष पाटील अंगणवाडीसेविकांच्या कायम सेवेसाठी लोकसभेत विधेयक मांडणार
अंगणवाडीसेविकांच्या सेवा नियमित करण्यात याव्या, तसेच त्यांची कामगिरी व बोनस महागाईशी जोडण्यात यावी, असेही हे विधेयक मांडताना खा उन्मेष पाटील यांनी सांगितले.
देशातील अंगणवाडी सेविकांच्या सेवा कायम करण्यात याव्यात, यासाठी भाजपचे खासदार उन्मेष पाटील (जळगाव) यांनी शुक्रवारी लोकसभेत विधेयक सादर केले. हे विधेयक पीठासीन अधिकाऱ्यांनी चर्चेसाठी दाखल करून घेतले.
नियमितीकरण व कल्याण) विधेयक असे या विधेयकाचे नाव आहे. यात अंगणवाडीसेविकांच्या सेवा नियमित करण्यात याव्या, तसेच त्यांची कामगिरी व बोनस महागाईशी जोडण्यात यावी, असेही हे विधेयक मांडताना खा उन्मेष पाटील यांनी सांगितले. यावेळी पीठासीन अधिकारी असलेल्या भर्तुहरी मेहताब यांनी हे विधेयक दाखल करून घेतले.



