आपल खान्देश
मध्य उत्तर महाराष्ट्रात थंडीच्या लाटेचा इशारा!
मागील काही दिवसांपासून राज्याला हुडहुडी भरली असून, तापमानाचा पाराही चांगलाच घसरला आहे. त्यातच आता महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत थंडीच्या लाटेचा प्रभाव दिसणार आहे. त्यात नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्याचा समावेश आहे.हिमाचल प्रदेश आणि काश्मीर या उत्तर भारतातील भागात हिमवृष्टी होत असल्याने देशातील विविध भागांमध्ये तापमानात घट झाली आहे.
पुढील ४८ तासांसाठी प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईने उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट आणि थंड दिवस राहण्याचा इशारा दिला आहे.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/89p4H3yVNq भेट द्या pic.twitter.com/jBkPDcShdF— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) January 30, 2022


