राज्यातील जनतेने भाजपाच्या षडयंत्राला बळी पडू नये, अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी. उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून दंगलीचे राजकारण.
मुंबई – त्रिपुरात घडलेल्या घटनेचे पडसाद म्हणून महाराष्ट्र अमरावती, नांदेड, मालेगावसह काही भागात वातावरण पेटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. उत्तर प्रदेशसह पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका लवकरच होत आहे. दंगली पेटवून निवडणुकीत त्याचा फायदा घेण्याचा भाजपाचा नेहमीप्रमाणे डाव आहे.
म्हणूनच त्रिपुरा घटनेच्या आडून महाराष्ट्रात दंगली पेटवून त्यावर उत्तर प्रदेशात आपली राजकीय पोळी भाजण्याचे भारतीय जनता पक्षाचे षडयंत्र असून या षडयंत्राला राज्यातील जनतेने बळी पडू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये शांतता राखावी, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा