अमरावती : त्रिपुरा हिंसाचाराचे पडसाद महाराष्ट्रातही उमटू लागले आहेत. त्रिपुरामध्ये मस्जिद पाडल्याच्या कथित घटनेच्या निषेधार्थ अमरावतीमध्ये मुस्लिम बांधवांनी आपली दुकाने बंद ठेवत अनेक मुस्लिम संघटनांनी निदर्शने केली. तसेच 15 ते 20 हजार लोक त्रिपुरातील घटनेचा निषेध करण्यासाठी मोर्चा काढत रस्त्यावर उतरले. मात्र या मोर्चाला आता हिंसक वळण प्राप्त झाले असून अमरावतीतील जयस्थभ चौकातील तसेच इतर ठिकाणी असलेल्या 20 ते 22 दुकानांची तोडफोड आहे. राजकमल चौकातही मोठ्या प्रमाणात जमाव एकवटला असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तणावपूर्व परिस्थिती निर्माण झाली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा