आपल खान्देशआरोग्य व शिक्षण

प्रा. जयश्री वर्मा वाघ यांना राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांकाचे पारितोषिक.

पाचोरा | श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पाचोरा येथील प्राध्यापिका सौ. जयश्रीताई वर्मा वाघ यांना अहिल्यानगर जिल्ह्यात ‘बेस्ट रिसर्च पेपर प्रेझेंटेशन’चा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील पद्मश्री विखे पाटील कॉलेज, च्या वाणिज्य विभागामार्फत आयोजित ‘विकसित भारत @2047’ या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या सत्रात बोलत होत्या. ही परिषद दि. 13 व 14 फेब्रुवारी 2026 रोजी प्रवरानगर, ता. राहता, जि. अहिल्यानगर येथील ऐपीजे अब्दुल कलाम सेमिनार हॉल येथे आयोजित करण्यात आली होती.

यावेळी संस्थेचे सहसचिव भारत घोगरे यांनी सांगितले की पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी ग्रामीण भागाचा विकास करत असताना सहकाराच्या माध्यमातून हा विकास साधला. आज ग्रामीण भारत सक्षम करण्यासाठी प्रवरा परिसराचा आदर्श महत्त्वपूर्ण ठरत आहे, असेही त्यांनी नमूद केले.

या राष्ट्रीय चर्चासत्रासाठी महाराष्ट्र, गुजरात, ओडिशा, कर्नाटक आदी राज्यांतून एकूण 170 संशोधन निबंध प्राप्त झाले. त्यापैकी सुमारे 40 संशोधक विद्यार्थी व प्राध्यापकांनी आपले संशोधन निबंध सादर केले.श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पाचोरा येथील प्राध्यापिका सौ. जयश्रीताई वर्मा वाघ यांना ‘बेस्ट रिसर्च पेपर प्रेझेंटेशन’चा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. भारत विकसित राष्ट्र होण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे. भारताच्या विकासासाठी आपण आपले योगदान देताना सुरुवात स्वतःपासून करावी.स्वतःचा विकास केल्यास त्यातून देशाचाही विकास साध्य होईल. हे करीत असतांना मानव म्हणून मानवा सारखे वागणे ही तितकेच महत्त्वाचे आहे आणि येत्या काळात भारत जागतिक महासत्ता देश बनल्याशिवाय राहणार नाही, असे मत प्राध्यापिका सौ. जयश्रीताई वर्मा वाघ यांनी व्यक्त केले.

यावेळी शिक्षण संचालक डॉ. प्रदीप दिघे, केबीपी कॉलेजच्या अधिष्ठाता डॉ. हर्षा गोयल, कर्नाटक येथील डॉ. विद्या जिरगे, मुंबई येथील डॉ. चंद्रशेखर देवरे, डॉ. श्याम साळुंखे, उपप्राचार्य डॉ. आर. ए. पवार, डॉ. भाऊसाहेब रणपिसे तसेच वाणिज्य विभागातील तज्ञ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.डॉ. दीपक पाटील यांनी प्रास्ताविक केले. डॉ. आर. ए. पवार यांनी महाविद्यालय व संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देत परिषदेचे महत्त्व विशद केले. सूत्रसंचालन डॉ. शांताराम चौधरी यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. विजय खर्डे यांनी केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे