आपल खान्देशब्रेकिंग

प्रसिद्ध हिंदू व्याख्यात्या हर्षुताई ठाकूर यांच्या व्याख्यानाने दुमदुमली शिवजयंती..

  • चेतना हिरे पाचोरा तालुका

अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पाचोरा तालुक्यात  उत्साहपूर्ण वातावरणात निर्माण झाली होते कुऱ्हाड गावात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने हिंदुत्ववादी व्याख्यात्या हर्षुताई ठाकूर यांचे प्रभावी व प्रेरणादायी व्याख्यान पार पडले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड गावात उत्साहपूर्ण वातावरणात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने हिंदुत्ववादी व्याख्यात्या हर्षुताई ठाकूर यांचे प्रभावी व प्रेरणादायी व्याख्यान पार पडले. हिंदू धर्माचे संरक्षण, त्याचे महत्त्व आणि संस्कृती जपण्यासाठी आवश्यक बाबी यांवर त्यांनी ओजस्वी शब्दांत मार्गदर्शन केले. त्यांच्या अभ्यासपूर्ण आणि जाज्वल्य भाषणाने उपस्थित श्रोते अक्षरशः भारावून गेले.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून कुऱ्हाड गावच्या सरपंच कविता प्रदीप महाजन उपस्थित होत्या. आपल्या मनोगतात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महिलांविषयीच्या आदर्श व सन्मानपूर्ण विचारांचा विशेष उल्लेख केला. शिवरायांनी स्त्री सन्मान, सुरक्षितता आणि स्वाभिमान यांना दिलेले महत्त्व अधोरेखित करत महिलांनी स्वावलंबी, सक्षम आणि आत्मविश्वासी बनावे, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला.

या कार्यक्रमासाठी गावातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण वातावरण देशभक्ती आणि शिवप्रेमाने भारलेले होते. यावेळी कविताताईंनी शिवउत्सव समितीच्या कार्याचे भरभरून कौतुक केले व अशा उपक्रमांमुळे गावात सामाजिक जागृती आणि एकोपा निर्माण होतो, असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमादरम्यान सरपंच कविताताई महाजन यांच्या नेतृत्वाखाली गावकऱ्यांनी एकमुखाने शिवगर्जना केली. तो क्षण प्रत्येकासाठी अभिमान, ऊर्जा आणि भावनांनी ओथंबलेला होता. गावभर शिवरायांच्या नावाचा जयजयकार घुमला आणि परिसर दुमदुमून गेला. 

डॉ. प्रदीप महाजन आणि सरपंच कविता ताई महाजन या दाम्पत्यांच्या हस्ते शिवबांचा पाळणा व आरती करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. भक्ती, अभिमान आणि उत्साहाने नटलेला हा शिवजयंती सोहळा गावकऱ्यांच्या मनावर अविस्मरणीय ठसा उमटवून गेला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे