आपल खान्देश

पाचवी-आठवी शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पाचोरा तालुक्यात तेरा केंद्र..

पाचोरा | पाचवी आणि आठवी विद्यार्थ्यांची शासकीय शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी २२ फेब्रुवारी रोजी पाचोरा तालुक्यातील तेरा केंद्रावर होणार आहे. गटशिक्षणाधिकारी विजय पवार व अधीक्षक सरोज गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्यवृत्ती परीक्षा सुव्यवस्थेसाठी नियोजन करण्यात आले आहे.

तालुक्यात इयत्ता पाचवीसाठी एक हजार २६२ आणि आठवीसाठी ६६९ असे एकूण एक हजार ९३१ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी प्रविष्ट आहेत. परीक्षा नियंत्रणासाठी प्रत्येक केंद्रावर भेटीचे नियोजन करण्यात आले आहे. शिष्यवृत्ती परीक्षा कामकाजासाठी पाचोरा तालुका गटशिक्षणाधिकारी विजय पवार, शालेय पोषण आहार अधीक्षक सरोज गायकवाड, गिरीष भोयर, सुनील शिवदे, नूर खान, राकेश धायबर तसेच सर्व केंद्र प्रमुख कार्यवाही करत आहेत.

मिशन स्कॉलरशिप उपक्रम अंतर्गत यावर्षी दोन सराव परीक्षा घेण्यात आल्या आहेत. शाळा स्तरावर नियमित मार्गदर्शन वर्ग घेण्यात आले असून परीक्षेत कोणताही गैरप्रकार झाल्यास कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे गट शिक्षणाधिकारी विजय पवार यांनी म्हटले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे