क्रौर्याची सीमा पार! अल्पवयीन मुलीवर पोलिसासह तब्बल 400 जणांकडून अत्याचार
बीड : राज्यात बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असताना आणखी एक संतापजनक आणि अंगावर शहारे आणणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सहा महिन्याच्या काळात बीडच्या अंबेजोगाई येथील एका सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर तब्बल चारशेहून अधिक नराधमांनी अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यात एका पोलीस कर्मचाऱ्याचादेखील समावेश असून संबंधित अल्पवयीन मुलगी वीस आठवड्याची गर्भवती आहे. तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. या घटनेमुळे बीडमध्ये खळबळ उडाली आहे.
काही दिवसांपूर्वी देखील एका अल्पवयीन मुलीवर 33 जणांनी बलात्कार केल्याच्या घटनेने महाराष्ट्राला हादरवून टाकले होते. मात्र आता बीडमध्ये तर क्रौर्याची हद्द पार केली आहे. अल्पवयीन मुलीच्या असाहय्यतेचा गैरफायदा घेत चारशे जणांनी तिच्यावर अत्याचार केला. बालहक्क कार्यकर्त्यांच्या सजगतेमुळे हा प्रकार समोर आल्यानंतर बालकल्याण समितीसमोर झालेल्या सुनावणी दरम्यान ही बाब उघडकीस आली आहे.




