आपल खान्देशब्रेकिंग

नवीन धुळे रेल्वे स्थानक उत्तर महाराष्ट्राच्या रेल्वे नकाशावर महत्त्वाचे रेल्वेस्टेशन..!

धुळे |  धुळ्यातील बाळापूर परिसरात उभारलेले ‘न्यू धुळे रेल्वे स्थानक’ उत्तर महाराष्ट्राच्या रेल्वे नकाशावर महत्त्वाचे ठिकाण ठरणार असून, सुरू असलेले आणि प्रस्तावित रेल्वे प्रकल्प पाहता हे स्थानक भविष्यात महत्त्वाचे जंक्शन म्हणून विकसित होण्याची शक्यता जानकरांनी व्यक्त केली आहे. भौगोलिक स्थान, वाढती प्रवासी व मालवाहतूक तसेच पायाभूत सुविधांतील सुधारणा यामुळे न्यू धुळे हे केवळ मध्यम स्वरूपाचे स्थानक न राहता बहुमार्गीय रेल्वे केंद्र ठरण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

मनमाड–इंदूर हा बहुप्रतिक्षित रेल्वे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर न्यू धुळेचे महत्त्व आणखी वाढणार असून या मार्गामुळे मध्य प्रदेशातील इंदूर, उज्जैन आणि माळवा भाग थेट उत्तर महाराष्ट्राशी जोडला जाणार असून, पश्चिम भारतातून मध्य भारताकडे जाणाऱ्या गाड्यांसाठी न्यू धुळे हे महत्त्वाचे इंटरचेंज ठरणार आहे.

न्यू धुळे हे रेल्वे स्थानक सूरत–भुसावळ या प्रमुख रेल्वे मार्गावर चालणाऱ्या गाड्यांसाठीही महत्वाचे ठरणार असून या नव्या रेल्वे मार्ग संपर्कातून गुजरातमधील औद्योगिक पट्टा, खानदेश आणि विदर्भ यांना जोडळा जाईल. यामुळे साहजिकच हा रेल्वे मार्ग प्रवासी व मालवाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जाणार आहे. सुरत,- भुसावळ या मार्गावरील गाड्यांची संख्या वाढत असल्याने न्यू धुळे येथे थांबे, क्रॉसिंग तसेच गाड्यांच्या संचालनाशी संबंधित सुविधा अधिक सक्षम करण्याची आवश्यकता आपोआपच निर्माण झाली आहे.

मनमाड–इंदूर हा बहुप्रतिक्षित रेल्वे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर न्यू धुळेचे महत्त्व आणखी वाढणार आहे. या मार्गामुळे मध्य प्रदेशातील इंदूर, उज्जैन आणि माळवा भाग थेट उत्तर महाराष्ट्राशी जोडला जाणार असून, पश्चिम भारतातून मध्य भारताकडे जाणाऱ्या गाड्यांसाठी न्यू धुळे हे महत्त्वाचे इंटरचेंज ठरणार आहे. परिणामी, पूर्व–पश्चिम आणि उत्तर–दक्षिण दिशेची रेल्वे वाहतूक येथे केंद्रित होण्याची शक्यता आहे. धुळे परिसरातील औद्योगिक आणि कृषी उत्पादनही न्यू धुळे जंक्शनच्या संकल्पनेस पूरक ठरत आहे. औद्योगिक विकास क्षेत्र, कापूस, कांदा, धान्य तसेच विविध औद्योगिक मालाच्या वाहतुकीसाठी रेल्वे मालधक्का, गुड्स शेड आणि लॉजिस्टिक सुविधा विकसित झाल्यास न्यू धुळे हे उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाचे मालवाहतूक केंद्र ठरू शकते. यामुळे रस्ते वाहतुकीवरील ताण कमी होऊन रेल्वे वाहतुकीचा वापर वाढण्यास मदत होणार आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे