महाराष्ट्रराजकीय

काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून राष्ट्रवादीचा जन्म- अनंत गीते

रायगड – किरीट सोमय्या यांनी राज्य सरकारमधील मंत्र्यांवर आरोपांचे सत्र सुरू ठेवले असताना आता महाविकास आघाडीमधील मतभेदही समोर येऊ लागले आहेत. शिवसेनेचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी परखड भूमिका मांडत थेट राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्ला केला आहे. काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून राष्ट्रवादीचा जन्म झाला, त्यामुळे शिवसैनिकांनी आपलाच पक्ष वाढवण्यावर भर द्यावा, आघाडीचे काय ते नेते पाहून घेतील, असे वक्तव्य केले आहे.

एवढेच नाही तर त्यांनी शरद पवार यांच्यावरही टीका केली आहे. “कुणी कितीही उपाध्या देवो, जाणता राजा होवो, पण आमचा गुरू होऊ शकत नाही, बाळासाहेब हेच आमचे गुरू, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांची शिवसेना कधीच होणार नाही” या शब्दात गीते यांनी टीका केली आहे. मुख्यमंत्री आपले पण सरकार महाविकास आघाडीचे आहे अशी भूमिता त्यांनी शिवसैनिकांसमोर मांडली. श्रीवर्धन येथील काही कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यावेळी गीते यांनी भाषणात आपली भूमिका मांडली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे