महाराष्ट्र

ब्रेक द चेन’ व्यापारी वर्गासाठी ठरताहे ‘ब्रेक द लाईफ’!

ब्रेक द चेन’ व्यापारी वर्गासाठी ठरताहे ‘ब्रेक द लाईफ’!

दिलीप परदेशी झूम मराठी न्यूज 

राज्य सरकारने मिनी लॉकडाऊन जाहीर केला. मात्र, प्रत्यक्षात हा ‘ब्रेक द चेन’ व्यापारी वर्गासाठी ‘ब्रेक द लाईफ’ ठरू शकतो, अशा प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी व्यक्त करीत आज राज्यभर निषेध नोंदविला. प्रत्येक शहरांत व्यापारी वर्गाने रस्त्यावर उतरून राज्यसरकार विरोधात घोषणाबाजी करताना दिसत आहेत.राज्य सरकारने जनतेची घोर फसवणूक केली,अश्या शब्दात यावेळी टीका होताना दिसत आहे .

मिनी लॉकडाऊन च्या नावाखाली संपूर्ण लॉकडाऊन लागू केल्याचा आरोप करीत आज राज्यात ठिकठिकाणच्या व्यापाऱ्यांनी रस्त्यावर उतरून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. २५ दिवस दुकाने बंद ठेऊन कसे जगायचे असा संतप्त प्रश्न व्यापाऱ्यांनी उपस्थित केला.

  • कन्फ्युजन ही कन्फ्युजन है, सोल्युशन का पता नहीं

दरम्यान, कोरोनाच्या प्रसाराला अटकाव करण्यासाठी निर्बंध लावण्याच्या नावाखाली राज्य सरकारने लॉकडाऊन लावत जनतेची घोर फसवणूक केली आहे. रोज बदलणारे नियम, मंत्र्यांची परस्पर विरोधी विधाने पाहता राज्य सरकारची परिस्थिती “कन्फ्युजन ही कन्फ्युजन है, सोल्युशन का पता नहीं” अशी झाली आहे, अशी टीका होताना दिसत आहे

राज्यात कठोर निर्बंध लावले जाणार असून केवळ आठवड्याच्या अखेरीस शनिवारी, रविवारी पूर्ण लॉकडाऊन असेल असे सरकारमधील चार-चार मंत्र्यांनी विविध वृत्तवाहिन्यांवर सांगितले होते. जनतेच्या हिताचा सारासार विचार करून हा निर्णय घ्यायला हवा होता. मात्र, मंगळवारी राज्यभरातली गोंधळाची परिस्थिती पाहता राज्य सरकारने विरोधी पक्षांसह जनतेची सुद्धा फसवणूक केल्याचे दिसून आले. पोलिस आणि अधिकाऱ्यांच्या मदतीने प्रत्येक जिल्ह्यात बाजारपेठा, दुकाने बंद केल्याचे चित्र मंगळवारी पाहायला मिळाले. महाविकास आघाडी सरकारला कठोर निर्बंध लावायचे आहेत की लॉकडाऊन असा सवाल उपस्थित केला जात आहे

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे