देशात मकर संक्रांतीला तिळाचा गोडवा वाटला जात असतानाच गोल्डनवीर जवानाला आले वीर मरण!
त्यांच्या निधनाची बातमी समजताच बोलठाण आणि बॉर्डर परिसरात तसेच संपूर्ण नांदगाव तालुक्यात संक्रांतीचा गोडवा शोकसागरात बुडाला.
नांदगाव,(प्रतिनिधी,) मुक्ताराम बागुल – नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावरील बोलठाण येथील हिम्मतराव पाटील यांचे सुपुत्र अमोल दादा पाटील यांचा सीमेवर कार्यरत असतानां हाय वोल्टज विजेच्या तारेचा धक्क्याने अपघाती निधन झाले शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असे तहसीलदार डॉ सिद्धार्थ मोरे यांनी सांगितले.
मकर संक्रांतीच्या सणासुदीच्या दिवशी काळाने घात घातला आहे. काल दिनांक 14 जानेवारी 2005 रोजी शुक्रवारी संपूर्ण देशात मकर संक्रांतीला तिळाचा गोडवा वाटला जात असतानाच देशाच्या नेपाळ सीमेवर कार्यरत असलेल्या नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावरील बोलठाण येथील अमोल हिम्मतराव पाटील वय वर्षे 30 या जेवणाला नेपाळ येथील सीमेवर कार्यरत असताना ११के. व्ही. विजेच्या तारेचा धक्क्याने अपघाती निधन झाले. या अपघातात अन्य दोन जमीनदेखील वीर मरण आले असल्याचे समजते. अमोल हिम्मतराव पाटील हा आर्मीत सैन्यदलात कामासाठी कार्यरत होता त्यांच्या निधनाची बातमी समजताच बोलठाण आणि बॉर्डर परिसरात तसेच संपूर्ण नांदगाव तालुक्यात संक्रांतीचा गोडवा शोकसागरात बुडाला.
अमोल दादा हिम्मतराव पाटील यांचे वडील पाटील काही दिवसापूर्वी मयत झाले आहेत. त्यांच्या पश्चात आई व भाऊ पाठीमागे असून पत्नी लहान मुले आहेत

वीर जवान अमर रहे!


