रश्मी ठाकरेंबद्दल जितेन गजारियांची आक्षेपार्ह पोस्ट ; सायबर सेलकडून गजारियांची सहा तास चौकशी त्यानंतर सुटका, काय आहे प्रकरण?
झूम मराठी वृत्तसेवा
मुंबई राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह टिपणी केल्याप्रकरणी भाजपचे महाराष्ट्र सोशल मीडिया प्रभारी जितेन गजरिया यांना पोलिसांनी नोटीस बजावली होती. त्यानंतर त्यांना मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने अटक देखील केली.या दरम्यान मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने सहा तासांची चौकशी करुन सोडलं आहे. जितेन गजारीया यांची बीकेसी पोलिसांकडून सहा तासांपासून चौकशी सुरु होती. अखेर त्यांना पोलिसांनी चौकशी करुन सोडलं आहे.
काय आहे प्रकरण ?
भाजपचे महाराष्ट्र सोशल मीडिया प्रभारी जितेन गजरिया यांनी रश्मी ठाकरे यांच्या विरोधात ट्वीट करताना ‘महाराष्ट्राची राबडी देवी’ असं आक्षेपार्ह लिखान केलं आहे. जितेन गजारिया यांनी केलेली पोस्ट ही अत्यंत आक्षेपार्ह असून त्या विरोधात महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप नोंदवला होता. त्यानंतर सायबर पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या ट्वीटवरुन सायबर पोलिसांनी जितेन गजरिया यांना नोटीस पाठवली असून त्यांना जबाब नोंदवण्यासाठी बोलावलं होतं. या ट्वीटसोबतच जितेन गजारिया यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विरोधातही आक्षेपार्ह ट्वीट केलं आहे. आता या ट्वीटमागे आणि त्यामधील मजकूरामागे काय हेतू होता ही माहिती घेण्यासाठी सायबर पोलिसांनी जितेन गजारिया यांना अटक करून त्यांचा जबाब नोंदवला आहे. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने सहा तासांची चौकशी करुन सोडलं आहे.
जितेंद्र गजारिया यांचा माफीनामा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सामनाच्या उपसंपादक व मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्विट करणारा भाजप पदाधिकारी जितेन गजारिया यांनी अखेर ट्विटबाबत लेखी माफी मागितली आहे. त्यानंतर जितेन गजारिया यांनी बीकेसी सायबर पोलिसांना माफीपत्र लिहून दिल्यावरच त्यांची सूटका करण्यात आली.


