आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

ओमायक्रॉनच्या रूपात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते; त्यामुळे जास्तीत जास्त खबरदारी घ्या, राजेश टोपे यांचे आवाहन

कुठल्याही परिस्थितीत गर्दी करु नका आणि सोशल डिस्टन्सिंग जास्तीत जास्त पाळा. आपली प्रतिकारशक्ती चांगली ठेवा. लसीकरण तात्काळ करुन घ्या.’ असे आवाहन राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जनतेला केले आहे.

झूम मराठी वृत्तसेवा

ओमायक्रॉन या नव्या कोरोनाच्या व्हेरिएंटमुळे कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असून, जर आपण काळजी घेतली नाही तर ओमायक्रॉनच्या रूपात तिसरी लाट येऊ शकते असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

राजेश टोपे काय म्हणाले

‘ओमायक्रॉनच्या बाबतीत लोकांच्या मनात साधारण जी दहशत झालेली आहे. ती दहशत स्वाभाविक आहे कारण आपल्याला कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा अनुभव लोकांनी घेतलेला आहे त्यामुळे निश्चित प्रकारे एक धास्ती वाटते.’  ‘आपल्याला आज जी काही माहिती उपलब्ध आहे त्यावरून असे काहीही वाटत नाही. की, फार सीरियस पेशंट होतात, फार प्रमाणात दवाखान्यांमध्ये भरती करावी लागते, फार मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन आणि आयसीयूची गरज पडते. आणि मृत्यूदर खूप जास्त आहे अशातला ओमायक्रॉनचा प्रॉब्लेम नाही.’ ‘ओमायक्रॉन खूप झपाट्याने पसरणारा आहे. कारण द. अफ्रिकेत डेल्टा व्हेरिएंटला पूर्णपणे रिप्लेस करण्याचे काम हे ओमायक्रॉनकडून झालेले आहे. याचा अर्थ त्याच्या संसर्गाची जी गती आहे ती खूप जास्त आहे.’

‘आता जसे कर्नाटकमध्ये आले आहे. त्याचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग चालू आहे. त्यातूनही सात-आठ लोकं पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर या सगळ्या गोष्टींमुळे नक्कीच संसर्ग वाढेल. ‘ओमायक्रॉनच्या संसर्गाची भीती नक्कीच वाटते. त्याची काळजी आपल्याला घ्यायलाच पाहिजे. कदाचित जी तिसरी लाट पुढच्या काळात असू शकेल तर ती माइल्ड स्वरुपाने का होईना. पण येऊ शकेत. परंतु असे सांगता येणार नाही. जर आपण काळजी नाही घेतली तर ती ओमायक्रॉनची देखील असू शकते.’

‘मात्र, ओमायक्रॉनपासून घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. द. आफ्रिका आणि ज्या-ज्या देशांमध्ये ओमायक्रॉन आहे तिथे आपल्याला जो तज्ज्ञांचा अभ्यास आहे जी माहिती मिळालेली आहे त्यामध्ये मी आता जशी माहिती दिलेली त्यापद्धतीने काळजी करण्यासारखा विषय नाही.’

‘संसर्ग वेगाने होते पण धोकादायक अजिबात नाही. त्यामुळे हा जो मास्क आहे तो काढू नका. कुठल्याही परिस्थितीत गर्दी करु नका आणि सोशल डिस्टन्सिंग जास्तीत जास्त पाळा. आपली प्रतिकारशक्ती चांगली ठेवा. लसीकरण तात्काळ करुन घ्या.’ असे आवाहन राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जनतेला केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे