महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ‘एक्शन’ मोडमध्ये ; ओमिक्रॉनबाबत आज करणार टास्क फोर्सशी चर्चा!

राज्यात कोरोनाच्या  संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका कायम असताना ओमिक्रॉन नावाच्या नव्या व्हेरियंटमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.डोंबिवलीतील युवकाला व्हेरियंटची लागण झाल्याने राज्य सरकारची डोकेदुखी वाढली आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अ‌ॅक्शन मोडमध्ये आले असून ओमिक्रॉनबाबत ते आज टास्क फोर्सशी चर्चा करणार आहे. यात ते कोरोना परिस्थिती, नव्या ओमिक्रॉन व्हेरियंटबाबत माहिती घेतील. कल्याण डोंबिवलीमध्ये ओमिक्रॉनचा रुग्ण सापडल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले . सध्या या रुग्णावर उपचार सुरू असून या रुग्णाची तब्बेत चांगली आहे. जगभरात ओमिक्रॉनचा धोका वाढल्यानंतर महाराष्ट्रानेही खबरदारी घेतली आहे.

ओमिक्रॉन या करोनाच्या नव्या व्हेरियंटचा लहान मुलांना सर्वाधिक धोका आहे. हे लक्षात घेता लहान मुलांची काळजी घेण्याचे आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे. या पार्शवभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यातील टास्क फोर्स व त्यामधील डॉक्टर, आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांच्याशी आज सविस्तर चर्चा करणार असल्याची माहिती आहे.

राज्यातील कोरोना परिस्थित आढावा, तसेच आतापर्यंत किती नागरिकांचे लसीकरण झाले यासंदर्भात माहिती मुख्यमंत्री घेणार आहेत. तसेच राज्यातील शाळांबाबत घेण्यात येणाऱ्या निर्णयावरही ते या बैठकीत चर्चा करणार असल्याची माहिती आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे